धार्मिक
मुंबादेवी तरुण मंडळ कार्यकारणी जाहीर
मुंबादेवी तरुण मंडळ कार्यकारणी जाहीर
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरातील मुंबादेवी तरुण मंडळ गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवीत असतात. कोपरगाव शहरातील मुंबादेवी तरुण मंडळाची उत्सव कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे.मुंबादेवी तरुण मंडळ उत्सव कार्यकारणीच्या अध्यक्षपदी राहुल खडांगळे, उपाध्यक्ष पदी निखील जोशी, खजिनदारपदी विनायक खडांगळे, कुणाल लोणारी तर सेक्रेटरीपदी अनिकेत बोरावके, हर्षल गवळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून या सर्व नुतन युवा पदाधिकाऱ्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मुंबादेवी तरुण मंडळाची ही उत्सव कार्यकारणी येणाऱ्या वर्षभरातील सर्व सण उत्सव गणपती नवरात्री आदी मोठ्या जल्लोषात साजरे करणार आहे.



