कृषीधन सोयाबीन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना पकडून चोरून नेलल्या 30 गोण्या सोयाबीन केले हस्तगत ,कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकान केली कारवाई
कृषीधन सोयाबीन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना पकडून चोरून नेलल्या 30 गोण्या सोयाबीन केले हस्तगत
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकान केली कारवाई.
संपादक; रवींद्र जगताप
मा.श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्री वैभव कलुचमे, अपर पालीस अधिक्षक श्रीरामपूर शिरोष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग, यांनी दिलेले आदेश व सुचनांनुसार पोलीस स्टेशन हददीत शेतक-यांचे सोयाबीन, कांदे इन्लेक्ट्रीक मोटारी चोरीचे प्रमाण वाढले त्या दृष्टीने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांनी शेतकर्यांच्या शेत मालाच्या चोरीच्या गुन्हे उघडकीस आणनेकरीता वैयक्तिक लक्ष घातले असुन अशा प्रकारचे गुन्हयांना आळा घालणेकरीता स्वतंत्र पोलीस तपास पथक नियुक्त केलं आहे

कोपरगाव तालुका पोलीसांनी कोपरगाव ता. पो.स्टे. गु.र.नं. 02/2024 भा.द.बि.क. 379 या गुन्हयांत इसम नामे अमोल वाल्मीक दंडवते वय 25 वर्षे रा. दंडवते वस्ती तीन चारी, ता. कोपरगाव यास अटक करुन त्याची पोलीस कोठडीत रिमांड घेतली. आरोपीस पोलीस कोठडीत रिमांडच्या मुदतीत विश्वासात घेवुन विचारपुस केली असून, त्याने पोलीसांना गुन्हयाची कबुली दिली. मात्र त्याचे इतर साथीदारांचे नांच पत्त्याबाबत माहीती सागण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पोलीसांना लक्षात आले. व त्याचे साथीदार आरोपींना पोलीस अटक करणार असल्याचा सुगावा लागल्यावर ते फरार झाले होते, मात्र पोलिसांनी तांत्रीक दृष्ट्या व कसोशीने तपास करुन गुन्हयाचे वेळी असलेले इत्तर साथीदार अमोल रामदास आहेर रा. तीनचारी ता. कोपरगाव श्रीकांत विलास चौरे रा. खडकी ता. कोपरगाव शुभम उर्फ शिवम रमेश भालेराव रा. खडकी ता. कोपरगाव यांचा शोध घेऊन वेगवेगळया ठिकाणाहून ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे, वरील आरोपींनी ब्राम्हणगाव शिवारातुन एकुण 74.000 रुपयांचे सोयाबीनच्या 39 गोण्या चोरुन नेलेला मुददेमाल आरोपीनी काढुन दिलेला आहे. व शेतकर्यांचे चोरुन नेलेले सोयाबीन हस्तगत करण्यात पोलीस पथकाने यश मिळविले आहे.सदरची कार्मागरी मा.श्री राकेश ओला सो पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्री वैभव कलुचमे,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, मा.श्री शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संदिप कोळी, पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अशोक आंधळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गागरे, पो. कॉ रशिद शेख, पो.कॉ. राघव कोतकर, पो.कॉ. रमेश झडे, पो.कॉ. अमोल फटांगरे, , तसेच पो.ना. सचिन धनाड नेमणुक सायबर सेल, श्रीरामपूर यांचे पथकाने केली आहे. पोलीस निरीक्षक श्री संदिप कोळी यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हददीतील इतर चोर्या उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली आहे.