देश-विदेश

भारतीय संविधान दिवस :- भरत मोरे यांचा विशेष लेख

भारतीय संविधान दिवस :- भरत मोरे यांचा विशेष लेख
२६/ ११ ,.. म्हणजे भारतीय संविधान दिवस… संविधान म्हणजे देशाचा कारभार चालविण्यासाठी तयार केलेल्या तरतुदी या नागरिकांना न्याय सुविधा देण्यासाठी ज्या ग्रंथात लिहील्या गेल्या त्या संविधानामुळे आज आपण या आभाळाखाली निर्धास्तपणे जगत आहे आणि भारतीय संविधान दिवस एकत्रितपणे आजही साजरा करत आहे,.. संविधानाची अंमलबजावणी दोन पध्दतीने केली जाते ,.पहीली पध्दत जी राजकारणातुन नागरिकांच्या वतीने लोकप्रतिनिधी म्हणून निवड करून लोकहिताचे सभागृह चालवणे आणि दुसरी पध्दत न्याय देण्यासाठी भारतीय न्यायालये चालविले जाणे,.आज आपण ज्या सुविधा लोकशाही मार्गाने उपभोगतो आहे ते फक्त आणि फक्त संविधानामुळेच,.शिक्षण,नौकरी, व्यापार या क्षेत्रात तळागाळातील तरूणांना संधी मिळावी,.मी गरीब, उपेक्षित असलो म्हणून काय झाले पण मी या देशाचा एक नागरीक आहे,.ज्या देशाचं संविधान आज सार्वभौमतेने जगात सगळ्यात मोठं संविधान आहे,.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड मेहनत घेवुन,. संघर्ष करून जगातील अनेक देशाच्या संविधानाचा बारकाईने अभ्यास केला आणि संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडला,.त्यानंतरही अनेक दुरूस्ती संविधानामध्ये संविधान सभेने सुचित केल्या,. नानाविध प्रश्नावली मांडली गेली,. पण देशाचं हित मनोमन जतन करणारे ते बाबासाहेब त्यांनी पुन्हा संविधानावर अभ्यास सुरू केला,.पुन्हा हिमालया एवढी प्रचंड मेहनत घेतली प्रत्येक प्रश्नाला त्या त्या कलमावार देशहितासाठी निर्दोष उत्तरे दिले,.आणि शेवटी संविधान सभेपुढे संविधान मसुदा हा अंतिम संविधान मसुदा देशाचं संविधान असेल आणि देश याच संविधानाच्या चौकटीत देशवासीयांचे हित जोपासेल हे २६/११/१९४९ रोजी संविधान सभेने स्विकारले म्हणून आपण २६/११ संविधान दिवस एकत्रितपणे आजही साजरा करतो आहे,.त्यावेळी २९९ सदस्य संविधान सभेत होते आणि त्या संविधान सभेचे अध्यक्ष डाॅ.राजेंद्रप्रसाद होते,.डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अर्थात त्यावेळी मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणून भारतीय संविधान निर्मीतीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मोलाच्या योगदानामुळेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आज आणि त्रिकाळ ओळखले जाणार.पण आज राजकीय पुढाऱ्यांनी पुढारलेली समाजव्यवस्था आणि स्वार्थिपणासाठी संविधानाचा पडत चाललेला विसर यामुळे लोकशाही धोक्यात येते कि काय असा सवाल आज देशवासीयांच्या समोर उभा राहीलेला आहे,समता,. स्वातंत्र्य,..बंधुतेची शिकवण देणारे संविधान आजही तळागाळातील सर्वसामान्यांना जगण्याची उमेद निर्माण करून देते,भारतीय संविधान दिवसाच्या भारतवासीयांना मनःपुर्वक शुभेच्छा.
आणि.२६/१२ च्या मुंबई येथील पाकीस्तानी अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि नागरिकांना भावपूर्ण आदरांजली

लेखन..भरत मोरे..दि.२६/११/२०२२

जाहिरात
  1. जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे