आरोग्य व शिक्षण

उपेक्षीत घटकांसाठीच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी व्हावी_स्नेहलता कोल्हे

संजीवनी युवा प्रतिष्ठान, नीलवसंत मेडीकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर, मणिशंकर आय हॉस्पीटल, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हॉस्पिटल, आत्मा मालिक हॉस्पिटल यांच्या सहकायने शहरातील गांधीनगर भागात मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे उदघाटन अशोक लकारे, शिवाजी खांडेकर यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या

उपेक्षीत घटकांसाठीच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी व्हावी_स्नेहलता कोल्हे.

संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगांव -आरोग्य ही जीवनाची गुरूकिल्ली आहे, आज प्रत्येकाच्या जीवनशैलीत ताण तणावामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे त्याची सर्वांनी काळजी घ्यावी, उपेक्षीत घटकासाठीच्या शासनस्तरावर असंख्य योजना आहे त्याची अंमलबजावणी तंतोतंत होण्यासाठी सर्व पदाधिका-यांनी जाणिवपुर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले. संजीवनी युवा प्रतिष्ठान, नीलवसंत मेडीकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर, मणिशंकर आय हॉस्पीटल,राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हॉस्पिटल, आत्मा मालिक हॉस्पिटल  यांच्या सहकार्याने शहरातील गांधीनगर भागात मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे उदघाटन अशोक लकारे, शिवाजी खांडेकर यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

       प्रारंभी डॉ. योगेश बत्रा यांनी प्रास्ताविकात डोळ्यांचे आरोग्य आणि आजार याविषयी माहिती दिली. श्री. शिवाजी खांडेकर म्हणाले की, संजीवनी उद्योग समूह तळागाळातील उपेक्षित घटकांसाठी व्हाट्सअप योजनांचा लाभ परिपूर्ण मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत, मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिरे ही गोरगरीब रुग्णांसाठी मोठी उपलब्धी आहे त्यांचे कार्य अलौकिक आहे.

           याप्रसंगी सर्वश्री. अमित निकम,  महेश गायकवाड, चेतन गवळी,  दिपक गवळी,  सिध्दार्थ साठे,  शक्तिभैय्या परदेशी,  सिध्दु भाटीया,  सतिश रानोडे,  आण्णा खरोटे, राजेंद्र गंगुले,  किशोर झाल्टे,  संजय सपकाळ,  सागर कोपरे, डॉ. शहानवाज शहा, ग. भा. शांताबाई साळुंके, ग. भा. मथुराबाई शिन्दे, सौ. रेखाताई कहार, शैनाज दादाभाई शेख, गणेश गायकवाड,  पियुश पापडीवाल, रावसाहेब साळुंके,  प्रभुदास पाखरे,  राजु वाणी,  स्वराज लकारे,संजय शेजवळ,  अमित आढाव, सुभाष नाईक,  रशिदभाई शेख,  काशिमभाई शेख,  बनेमियाॅभाई शेख, यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे