ब्रेकिंग

जागेच्या पाहणीसाठी एमआयडीसीचे अधिकारी कोपरगावात बेरोजगार युवकांच्या आशा पल्लवित

जागेच्या पाहणीसाठी एमआयडीसीचे अधिकारी कोपरगावात बेरोजगार युवकांच्या आशा पल्लवित

कोपरगाव :- मतदार संघातील बेरोजगार तरुणाईला मतदार संघातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोपरगाव शहरात एमआयडीसी व्हावी यासाठी आ.आशुतोष काळेंचा पाठपुरावा सुरु आहे. त्याबाबत कोपरगाव शहरातील जागेच्या पाहणीसाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवार (दि.०८) रोजी पाहणी केली आहे.

जाहिरात
जाहिरात

कोपरगाव मतदार संघाच्या विकासाला आकार देणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जनतेला दिलेल्या विकास कामांच्या वचनाबरोबरच बेरोजगारीचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी मतदार संघात एमआयडीसी उभारणार असल्याचे सांगितले होते. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून त्यांचा अविरतपणे पाठपुरावा सुरु आहे. मागील वर्षी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सावळीविहिर-सोनेवाडी शिवारात शिर्डी एम.आय.डी.सी. व डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन समारंभ महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला होता. त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहत येथील जिल्हा उद्योग केंद्राच्या मालकीची ७१.७५ हेक्टर, डेअरी पोल्ट्री अँड ब्रिडिंग फार्मचे मालकीची ८६.४० हेक्टर व अॅग्रीकल्चर कोपरगांव कॅटल ब्रिडिंग सेंटर फार्मचे मालकीची १५.१९ हेक्टर अशी एकूण १७३.३४ हेक्टर (४३३ एकर) जागा उपलब्ध असून सदरची जागा एम.आय.डी.सी.कडे वर्ग करून त्याठिकाणी उद्योग व्यवसाय सुरु करण्याची घोषणा करावी अशी अपेक्षा उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे व्यक्त केली होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी एमआयडीसीसाठी ४३३ एकर जागा विनामुल्य देण्याचे जाहीर करून लवकरच मंजुरी देणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळेंना दिली असता उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांनी देखील मागे न राहता महसूल मंत्र्यांनी जागा देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मी देखील कोपरगावात एमआयडीसी उभारण्याची जबाबदारी घेत असल्याचे त्यावेळी जाहीर केले होते.

जाहिरात

त्यानंतर २०२४ च्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील आ.आशुतोष काळे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या जागेवर उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांनी एमआयडीसी उभारण्यासाठी हिरवा कंदील दिला असून सदरची जागा तातडीने एमआयडीसीकडे त्वरित वर्ग करावी अशी मागणी केली होती. व आपला पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्या पाठपुराव्यातून एमआयडीसी उभारणीला चालना मिळत होती. व गुरुवार (दि.०८) रोजी एमआयडीसीच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड, क्षेत्र व्यवस्थापक दिलीप काकडे, प्रमुख भूमापक फुलचंद कातकडे  आदी अधिकाऱ्यांनी कोपरगाव शहरातील जागेची पाहणी केली आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांच्या आशा पल्लवित झाल्या असून एकदा हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्यंत सोडायचेच नाही असा स्वभाव असलेल्या आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून सोनेवाडी-सावळीविहीर बरोबरच कोपरगाव शहरात देखील लवकरच एमआयडीसी उभी राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी जागा पाहणीसाठी  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते

संपादक रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JbzONlETFfd5dY2t6kOUm6

नगर मनमाड रोडवर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता सविस्तर बातमीसाठी खालिल लिंक दाबा

https://youtu.be/-_WyxTHcthI?si=XdBcpGLMQKX6_-LR

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे