पुणतांबा येथे पहेलगाम घटनेचा निषेध.
पुणतांबा येथे पहेलगाम घटनेचा निषेध.
पुणतांबा येथे पहेलगाम घटनेचा निषेध.व मृत्युमुखी पडलेल्या बंधुंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.
जम्मू काश्मीर मधील पहेलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहेलगाम मध्ये पर्यटन स्थळावर अंदाधुंद गोळीबार करुन भ्याड हल्ल्या केला.यात निष्पाप भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.त्यांचे जिव वाचवण्यासाठी पहेलगाव मधील युवक आदिल हुसेन शाहा या जिगरबाज युवकाने कुठलीही तमा न बाळगता जिवाची बाजी लावून अतिरेक्यांशी दोन हात करत आपला जीव गमवला. त्यांचे पवित्र आत्मास चिरशांती व सदगती लाभावी म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन. तसेच या पाकिस्तानी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करुन.केंद्र सरकार ने लवकरात लवकर पाकिस्तान ला धडा शिकवावा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी.सौ मार्गेरेट बारसे.जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब पवार.सामाजिक कार्यकर्ते सचिन धनवटे. विशाल कचरे.बाळु जोगदंड.ग्रामपंचायत सद्स्य रविभाऊ थोरात.भाऊ थोरात . शिंदे.पवार यांचे सह नवनाथ वायकर.विजय चांदेकर.वाल्मिक कुलकर्णी. ज्ञानेश्वर नन्नवरे चि उत्कर्ष महेश कुलकर्णी यांनी दुःख व्यक्त करुन मृत्यूमुखी पडलेल्या बांधवांसाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांचे साक्षीने एक एक मेणबत्ती लावुन प्रार्थना केली.






