ब्रेकिंग

राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी गोरख देवडे

राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी गोरख देवडे

राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष श्री उमेश आनेराव यांनी अहमदनगर ओबीसी जिल्हाध्यक्ष पदी श्री गोरख देवडे यांची नियुक्ती केली आहे उमेश आनेराव यावेळी म्हणाले सामाजीक न्याय स्वातंत्र्य, समता बंधु या मुद्यावर आधारीत धर्मनिरक्षेपता लोकशाही प्रधान समाजीक तत्वज्ञानाचा प्रचार व्हावा आणि ओबीसी जनगणना करणे कामी, समाज संघटीत करण्यासाठी एका पिवळ्या झेंड्याखाली आणणे फार गरजेचे झाले आहे.  या  संपुर्ण कामासाठी जिल्हास्तरावर, तालुक्यातील ग्रामीण युवकांना प्रवाहात यावे यासाठी राष्ट्रीय ओबिसी फाऊडेशनच्या वतिने कामकाज केले जाणार आहे.  याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे, युवानेते विवेकभैय्या कोल्हे तसेच भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष डी.आर.काले, माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ दारुणकर,भाजपा अनु.जाती शहराध्यक्ष शंकरराव बिऱ्हाडे, सतिष रानोडे, सतिष चव्हाण, खालीकभाई कुरेशी आदिंनी अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री. देवडे म्हणाले तालुक्यातील असंख्य ओबीसी युवकांना संघटीत करणे कामी सामाजीक कार्यकर्त्यांनी हातभार लावावा. जेणे करुन आपला सामाजीक प्रश्न मार्गी लागेल सर्व ओबीसी घटकातील समाज बांधवांना व्यवस्थीत मार्गदर्शन भविष्य काळात मिळावे यासाठी प्रयत्नशील राहिल अशी   अपेक्षा केली.यावेळी सोमनाथ ताकवाले, रोहिदास पाखरे, सुरज सोनवणे, पंकज मोरे, प्रतिक निळकंठ, अविनाश नेवगे, अमोल शिवदे, अक्षय बरदे, सचिन खलसे, संजय तुपसौंदर, सुजल चंदनशिव, संजय खरोटे, फकीर मंहमद पहिलवान, कुणाल बरदे  आदी उपस्थिती होते आदी उपस्थिती होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे