राजकिय
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पाच पैकी दोन जागेवर काळे गटाचे उमेदवार बिनविरोध
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पाच पैकी दोन जागेवर काळे गटाचे उमेदवार बिनविरोध
कोपरगाव वार्ताहर- कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पाच जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू असतांना अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे काळे गटाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर एका जागेवर कोल्हे गटाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला असून दोन ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर,धोत्रे, चांदेकसारे,दहेगाव बोलका या चार ग्रामपंचायतीच्या सदस्य पदांच्या एकूण पाच जागांची पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू असतांना सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिंगणापूर ग्रामपंचायत निवडणुकीत इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे दोन जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्यामुळे त्या ठिकाणी काळे-कोल्हे गटाचे एकेक उमेदवार बिनविरोध निवडून आले असून चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत देखील सदस्य पदासाठी इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे काळे गटाचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहील्यामुळे त्याठिकाणीही काळे गटाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
त्यामुळे पार पडलेल्या पाच जागांच्या पोटनिवडणुकीत काळे गटाचे दोन जागेवर तर कोल्हे गटाचा एका जागेवर उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
तर धोत्रे व दहेगाव बोलका या ठिकाणी सदस्य पदाच्या एका जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.


संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk
कोपरगावात वास्तव राहिलेल्या शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे सुमित डेंगळे यांचे व्याख्यान
https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I


