आ.आशुतोष काळे प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी अभिनेत्री तेजश्री प्रधान, प्राजक्ता घाग व रील स्टार राशी शिंदे येणार

आ.आशुतोष काळे प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी अभिनेत्री तेजश्री प्रधान, प्राजक्ता घाग व रील स्टार राशी शिंदे येणार
कोपरगाव :कोपरगावकरांसाठी आ.आशुतोष काळे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आ.आशुतोष काळे प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण सोमवार (दि.२७) रोजी सायंकाळी ०६ वाजता कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार आहे. या बहुचर्चित कार्यक्रमासाठी ‘अगं बाई सासूबाई फेम’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान उपस्थित राहणार असून समवेत ‘गुलाबी साडी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता घाग, रील स्टार राशी शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.


आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघासह कोपरगाव शहरात केलेल्या विविध विकासकामांवर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा कोपरगावकरांसाठी ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत होंडा अॅक्टिवासह अनेक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी सहभागी स्पर्धकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासाला मूर्त रूप देतांना मतदार संघातील जनतेला दिलेली विकासाची बहुतांश आश्वासनं मागील सहा वर्षात पूर्ण करून दाखविली आहे. यामध्ये कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, मतदार संघातील सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्गाबरोबरच राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, गावांतर्गत रस्त्याबरोबरच वाड्या वस्त्यावरच्या रस्त्यांचा केलेला विकास, कोपरगाव शहराचा विकास असे रस्ते, वीज, पाणी आरोग्याचे अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लावले आहेत.झालेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचलेली असून आ.आशुतोष काळे यांनी कोणत्या विकास कामांसाठी किती निधी दिला हे मतदार संघातील जनता जाणून आहे. या सर्व विकासाच्या प्रश्नांवर आधारित असलेल्या या स्पर्धेसाठी कोपरगावकरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून विशेषत: महिला भगिनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेबाबत कोपरगावकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असून या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण प्रसंगी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री उपस्थित राहणार असल्यामुळे या स्पर्धेबाबत नागरिकांचा उत्साह अधिकच वाढला आहे.


तेजश्री प्रधान या प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री असून मराठी चित्रपटा बरोबरच छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्या घराघरात जावून पोहोचल्या आहे. संजू राठोडच्या गुलाबी साडी या गाण्याने महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर धुमाकूळ घातला आहे. हे गाणे संजू राठोडसमवेत ज्या अभिनेत्रीवर चित्रित करण्यात आले आहे ती गुलाबी साडी फेम अभिनेत्री प्राजक्ता घाग तसेच जीच्या फॅशन, डान्स आणि मनोरंजक व्हिडिओंसाठी ओळखली जाते ती प्रसिद्ध रील स्टार राशी शिंदे उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आ.आशुतोष काळे प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी सोमवार (दि.२७) रोजी सायं.०६ वा. कलश मंगल कार्यालय, कोपरगाव येथे या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी व या कलाकारांना भेटण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.




