देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत कविता साळुंके प्रथम

देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत कविता साळुंके प्रथम
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव – ( वार्ताहर / प्रतिनिधी ) – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना जेष्ठ नागरिक सेवा मंच व जेष्ठ महिला समितीचे वतीने देशभक्तपर गितगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते वय वर्षे चाळीसच्या पुढील महिलांसाठी स्पर्धा घेण्यात आली असली तरी वय वर्षे ऐंशीच्या महिलांनी सहभाग घेऊन देशाप्रती आदरभाव व्यक्त केला शहरातील अनेक क्षेत्रातील महिलांनी सहभाग नोंदविला व देशभक्तीपर गीते गाऊन परीक्षकांना कोड्यात टाकले
जेष्ठ महिला समितीने आयोजित केलेल्या गितगायन स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ सुरेखा बिबवे, सेवानिवृत्त कलाशिक्षक अनिल कुलकर्णी, विडंबनकार कवि सुधिर ( राजेंद्र ) कोयटे यांनी काम केले प्रारंभी प्रतिमा पूजन, दिपप्रज्वलन करून विरजवान पत्नी सरला जाधव यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले स्वागत प्रास्ताविक मंचच्या अध्यक्षा सौ सुधा भाभी ठोळे यांनी केले सुत्रसंचलन सौ शैलजा रोहोम यांनी केले सदर गितगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक कविता साळुंके ( रू ३१०० ), द्वितीय कल्याणी बनसोडे (२१००), तृतीय ज्योती अंकुश (११००),तर उत्तेजनार्थ सौ संगिता ताई मालकर, ललिता बळवंत बागुल यांना देण्यात आली सर्व सहभागी स्पर्धकांना साई प्रतिमा भेट देऊन गौरविण्यात आले सर्व बक्षिसे ठोळे उद्योग समुहाच्या वतीने देण्यात आली मंचचे संस्थापक अध्यक्ष कै भागचंदभाऊ ठोळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला उपक्रम, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी धडपडत असलेला महिला मंचचे उपस्थित सर्व महिलांनी कौतुक केले समारंभासाठी माजी नगराध्यक्षा मीनल खांबेकर, महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी, सुतारताई, प्रतिभा शहा,चंदाताई कोठारी, जयश्रीताई शहा, माधवी नेने, ब्राह्मण सभा महिला मंडळाच्या भगिनी,व शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तिरंगी ध्वजाचा बॅच बिल्ला लावून येणारांचे स्वागत करण्यात आले




