धार्मिक

सुभाषनगर प्रभागात सौ व श्री तनुजा गौतम बनसोडे यांच्या शुभहस्ते सत्यनारायण महापूजा संपन्न

सुभाषनगर प्रभागात सौ व श्री तनुजा गौतम बनसोडे यांच्या शुभहस्ते सत्यनारायण महापूजा संपन्न

 

कोपरगाव शहरातील सुभाषनगर भागामध्ये सन १९८० पासून सुरू झालेल्या गल्ली गणपती मंडळाचा आज दिनांक ०३ सप्टेंबर २०२२ रोजी श्री गणेश मंडळाच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी घटनाकार मैत्री संघाचे प्रमुख गौतम बनसोडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.तनुजा गौतम बनसोडे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करण्यात आले मागील दोन वर्ष कोरोना कालावधीमुळे श्री गणरायांचे आगमन फार कडक बंदोबस्तात करण्यात आले होते त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा आनंद घेता आला नाही मात्र यावर्षी गणरायाच्या कृपेने कोरोनाचे संकट विरळ झाले व हळूहळू सर्व सण उत्सव लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत एक आनंद उत्साह निर्माण झाला त्यामुळे यावर्षी मनसोक्त असा आनंद नागरिक घेत आहेत त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातील सुभाषनगर भागातील श्री गणेशाचे श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थानिक नागरिक व घटनाकार मैत्री संघाच्या वतीने वाजत गाजत विधीवत पूजन करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच आज दिनांक ०३ सप्टेंबर २०२२ रोजी धार्मिक विधी पंरपरेनुसार सत्यनारायण महापूजा करुन महाप्रसादाचा कार्यक्रम आज संपन्न झाला या पुजेनंतर महाप्रसादाला सुभाषनगर प्रभागातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे