कृषीवार्ता

लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा ना.आशुतोष काळेंच्या पशूसंवर्धन विभागाला सूचना

जनावरांना लम्पी स्किन सदृश रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ना.आशुतोष काळे

लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा ना.आशुतोष काळेंच्या पशूसंवर्धन विभागाला सूचना

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी  – कोपरगाव तालुक्यात अनेक जनावरांना लम्पी स्किन सदृश्य आजाराची लागण झाली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांच्या आरोग्यासाठी हानिकारक असून वेळप्रसंगी जनावरांचा जीव जाण्याचा धोका निर्माण झाला असून काही जनावरे या आजारामुळे मृत्यूमुखी पडली आहेत.याची गांभीर्याने दखल घेवून पशूसंवर्धन विभागाने जनावरांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी पशु संवर्धन विभागाला दिल्या आहेत.मागील काही दिवसात कोपरगाव तालुक्यातील काही गावांमध्ये जनावरांना लम्पी स्किन सदृश रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर ना.आशुतोष काळे यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून परिस्थिती जाणून घेत करावयाच्या उपाय योजना याबाबत सविस्तर चर्चा केली.यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ना.आशुतोष काळे यांनी सांगितले की, कोपरगाव तालुक्यातील काकडी गावातील काही जनावरांमध्ये लम्पी रोगाचे विषाणू आढळून आले आहेत. लम्पी स्किन आजारामुळे जनावरांची प्रतिकार शक्ती कमी होवून जनावरांना अनेक आजार होवू शकतात.त्यामुळे ज्या जनावरांमध्ये लम्पी स्किन सदृश आजाराचे लक्षण दिसत आहे अशा जनावरांचे व त्या गावातील व परिसरातील सर्वच जनावरांचे लसीकरण करण्यावर भर द्यावा जेणेकरून जनावरांमध्ये या आजाराची व्याप्ती वाढणार नाही व या आजारावर लवकर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व पशू धन वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. शेतकऱ्यांनी देखील पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून ज्या जनावरांमध्ये लम्पी स्किन सदृश्य रोगाचे लक्षण दिसत असल्यास त्या जनावरांचा इतर जनावरांशी संपर्क येवू न देता योग्य काळजी घेवून जनावरांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.यावेळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अजयनाथ थोरे, पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रद्धा काटे, डॉ.दिलीप जामदार आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे