महाराष्ट्र

एक राखी जवानांसाठी उपक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला

एक राखी जवानांसाठी उपक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला
सीमेवरील सैनिकांसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान करणार शिर्डी ते श्रीनगर(जम्मू) राखी सन्मान यात्रा
कोपरगाव – संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली “एक राखी जवानांसाठी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सदर उपक्रमाचा प्रारंभ कोपरगाव येथे झाला. शिर्डी ते श्रीनगर जम्मू या मार्गाने प्रवास करून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक थेट सीमेवर सैनिक बांधवांना त्या राखी सुपूर्त करणार आहेत. चार ऑगस्ट रोजी ही राखी सन्मान यात्रा आपला प्रवास सुरू करणार असून भव्य प्रमाणात नागरिक या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
या उपक्रमाच्या स्टॉलचे उद्घाटन सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, सीमेवर आपल्या रक्षणासाठी अहोरात्र सज्ज असलेल्या वीर जवानांना राखीच्या निमित्ताने प्रेमाचे आणि आपुलकीचे बंधन पोहोचवणे ही आपल्या संस्कृतीतील एक अनोखी भावना आहे. हा उपक्रम प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीचा नवा दीप प्रज्वलित करतो.
जाहि
या प्रसंगी विद्याताई सोनवणे, अनिताताई गाडे, सविताताई मोरे, प्रियंकाताई जगझाप, कलाबाई लकारे, सविताताई परदेशी, सुरेखाताई आवारे यांचा समावेश होता. तसेच प्रशांत कडू, फकीर महम्मद पहिलवान, संजय खरोटे, पंकज कु-हे आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती.गतवर्षी देखील हजारो महिला भगिनींनी आपल्या हस्तकलेने सजवलेल्या राख्या तयार करत देशभक्तीचा संदेश दिला. यावर्षी देखील व्यापक प्रमाणात मोहीम राबवत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने या राख्या थेट सीमावरील जवानांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत.हा उपक्रम सर्वत्र एक आगळा-वेगळा उपक्रम म्हणून सर्वत्र कौतुकास पात्र ठरत असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रेरणेतून संजीवनी युवा प्रतिष्ठानने हा उपक्रम अधिक व्यापक स्तरावर राबवण्याचा संकल्प केला आहे यासाठी सर्वांनी शुभेच्छा देत महिला भगिनींनी मोठ्या संख्येने आपली राखी आणि संदेश पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे