आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

सावळीविहीर फार्म शाळेत बाल आनंद बाजार ….

 

सावळीविहीर फार्म शाळेत बाल आनंद बाजार ….

सावळीविहीर /-राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक सावळीविहीर फार्म शाळेत सालाबाद प्रमाणे याही वर्षी नुकताच बाल आनंद बाजार झाला या माध्यमातून लहान मुलांना शाळेत असताना खरेदी विक्रीचे व्यवहार कसे केले जातात यांचे ज्ञान मिळावे हा हेतू व उद्देश ठेवून शाळेतील मुख्याध्यापक संदिप घोलप सर यानी शिक्षक योगेश बोरसे यांच्या सहकार्याने बाल आनंद बाजारसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मुलांना व्यावसायिक मार्गदर्शन केले तसेच लहान चिमुकल्या मुलांनी खाद्यपदार्थ फळे फुले भाजीपाला शालेय वस्तू शोभेच्या वस्तू खेळणी विविध प्रकारच्या वस्तूंचा बाजारात समावेश करण्यात आला होता लहान चिमुकल्यांनी वस्तूंची विक्री केली या बाजारात मोठ्या संख्येने पालक शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते चिमुकल्याचा चेहरा आनंदी व समाधानी दिसून येत होता तसेच मुलांची रांगोळी प्रदर्शन व महिला पालक हळदी कुंकु आयोजित कार्यक्रम होता यावेळी सरपंच सौ.अर्चनाताई क्षिरसागर ,माजी सरपंच अशोकराव जमधडे, पो.पा.राजेंद्र जमधडे, साईनाथ झिंजाड जालिंदर खरात, पत्रकार विजय खरात , अर्चनाताई क्षिरसागर म्हणाल्या की या माध्यमातून आपण चांगल्या विचारांचा वान घरी घेऊन जाणार आहे आशाताईंनी आरोग्याविषयी महिला व मुलींना मार्गदर्शन केले. सौ.कुलकर्णी ताईंनी मुले कशी घडवावी याबाबत मार्गदर्शन केले व शेवटी ग्रामपंचायत सदस्या सौ.महिमाताई झिंझाड यांनी महिला पालकांनी मुलांना आवडीनुसार मार्गदर्शन करावे असे सांगितले शेवटी बोरसे यांनी आभार मानले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे