पीपल्स रिपब्लिकन पार्टीत मोठा पक्षप्रवेश; राहुल भारुड यांच्यासह बेदराम कागडा यांना मुंबई प्रदेशात महत्त्वाची जबाबदारी

पीपल्स रिपब्लिकन पार्टीत मोठा पक्षप्रवेश; राहुल भारुड यांच्यासह बेदराम कागडा यांना मुंबई प्रदेशात महत्त्वाची जबाबदारी
मुंबई– पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या (PRP) मुंबई प्रदेश संघटनेला 15 जुलै 2026 रोजी वाकोला येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्यात मोठे बळ मिळाले. या सोहळ्यात सुप्रसिद्ध सिने अभिनेते राहुल भारुड आणि वाल्मिकी समाजाचे धडाडीचे नेते बेदराम कागडा यांनी पक्षात प्रवेश करत नवीन जबाबदारी स्वीकारली.

पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष माननीय विजय भाई वाघमारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन दोन्ही नेत्यांचे स्वागत करण्यात आले. पक्षाच्या ध्येयधोरणांना पुढे नेण्यासाठी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला.
*नवनियुक्त पदाधिकारी*
– *राहुल भारुड* – पीपल्स रिपब्लिकन पार्टी, मुंबई प्रदेश सचिव
– *बेदराम कागडा* – पीपल्स रिपब्लिकन पार्टी, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष
या प्रसंगी मुंबई अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष लॅरॉन गोन्सालविस, मुंबई संघटक रामदादा वाघ, कलिना विधानसभा अध्यक्ष विनोद जाधव, प्रदीप गमरे, अजिंक्य पवार यांसह अनेक भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या भावनेनुसार, “आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत होईल आणि समाजातील तळागाळातील घटकांना न्याय मिळेल” असा विश्वास आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.या पक्षप्रवेशामुळे मुंबईतील PRP च्या संघटनात्मक बांधणीला गती मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.




