श्री बाळासाहेब सातभाई मर्चन्टस को-ऑपरेटीव्ह बँक लि. कोपरगांव (विसर्जित) एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा कर्जदारने लाभ घ्यावा
श्री बाळासाहेब सातभाई मर्चन्टस को-ऑपरेटीव्ह बँक लि. कोपरगांव (विसर्जित) एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा कर्जदारने लाभ घ्यावा
संपादक:- रविंद्र जगताप
श्री बाळासाहेब सातभाई मर्चन्टस को-ऑपरेटीव्ह बँक लि. कोपरगांव (विसर्जित) ता. कोपरगांव या बँकेच्या सर्व थकबाकीदार कर्जदार व त्यांचे जामीनदार यांना कळविण्यांत येते की, मा. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक यांनी बँकेस एकरकमी कर्ज परतफेड योजना ६ टक्के सरळव्याज दराने अटी व शर्तीसह मंजुर केली आहे. सदरचा एकरकमी कर्ज परतफेड मंजुरीचा आदेश बँकेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यांत आलेला आहे.

तरी बँकेच्या सर्व थकबाकीदार कर्जदार यांनी बॅन्केचे कस्टोडीयन व व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधुन एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा व आपले कर्जखाते रक्कम भरुन बेबाक करावे व बॅन्केस सहकार्य करावे. अन्यथा आपणा विरुध्द व आपले जामीनदारां विरुध्द कायदेशिर मार्गाने कर्ज वसुलीची कारवाई करावी लागेल. असे जाहीर आवाहन बॅन्केचे कस्टोडीयन यांचेकडुन करण्यांत येत आहे.




