ब्रेकिंग

अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न सुरु – आ. आशुतोष काळे

कोपरगाव येथे आमदार चषक भव्य ‘डे नाईट’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी चेंडू फटकावतांना आ. आशुतोष काळे.

अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न सुरु – आ. आशुतोष काळे

भव्य ‘डे नाईट’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते उद्घाटन संपन्न  

कोपरगाव प्रतिनिधी  :- कोपरगाव मतदार संघातील उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य व खेळासाठी सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल उपलब्ध करून दिल्यास कोपरगावचे खेळाडू निश्चीतपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील याचा मला विश्वास आहे. त्यामुळे या खेळाडूंसाठी कोपरगाव येथे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात

कोपरगाव शहरातील के.बी.पी.विद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर आ. आशुतोष काळे मित्रमंडळफ्रेंड्स क्रिकेट क्लबश्री साई समर्थ प्रतिष्ठाणसाई सिटी क्रिकेट क्लब व माऊली क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित आमदार चषक भव्य ‘डे नाईट’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे (के.पी.एल.) उदघाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते स्पर्धेतील पहिल्या सामन्याची नाणेफेक करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले की, कोपरगाव शहरात तीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ‘डे नाईट’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवे क्रिकेट पर्व सुरू होत असून हि परंपरा यापुढे सुरु ठेवा. जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे यामध्ये कोपरगाव तालुक्याचा देखील समावेश असावा हि माझी इच्छा आहे. त्यामुळे मतदार संघातील खेळाडूंसाठी सर्व सुविधायुक्त अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी माझे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आय पी एल क्रिकेट स्पर्धा क्रिकेट रसिकांची पहिली पसंद आहे. या आय पी एल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अनेक अष्टपैलू खेळाडू उदयास येत असून केपीएल स्पर्धा आयपीएल स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी उत्तम माध्यम ठरणार असल्याचा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त करून आयोजकांनी स्पर्धेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतूक केले.याप्रसंगी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचाराजेंद्र कोयटेराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पेशहराध्यक्ष सुनील गंगूलेशहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकलेग्रामीण पोलीस निरीक्षक वासुदेव देसलेकार्याध्यक्ष संतोष चवंडकेमाजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावकेमंदार पहाडेसंदीप पगारेरमेश गवळीकृष्णा आढावराजेंद्र वाकचौरेदिनकर खरेअजीजशेखयुवक शहराध्यक्ष नवाज कुरेशीडॉ. तुषार गलांडेचंद्रशेखर म्हस्केबाळासाहेब रुईकरवाल्मिक लहिरेसंदीप कपिलेराजेंद्र खैरनारइम्तियाज अत्तारऋषिकेश खैरनारआकाश डागारहेमान कुरेशीनिलेश डांगेरविंद्र सोनटक्केसचिन गवारेराजेंद्र बोरावकेराजेंद्र आभाळेकलविंदरसिंग डडीयालमनोज नरोडेसंतोष शेजवळरिंकेश खडांगळेमुकुंद इंगळेनितीन सोनवणेडॉ. अच्युत कडलगविशाल निकमनवनाथ घुसळेराकेश धाकतोडेराजेंद्र नळेपवन चिबडेस्वप्नील आढावसुमित लोहाडेतुषार बागरेचाआनंद काळेयोगेश अमृतकरकाका वर्माअण्णा जंजिरेनारायण नळेनंदू कुऱ्हाडेयोगेश वाणीसंदीप सावतडकरकुंदन भारंबेरुपेश वाकचौरेराहुल हंसवालनिलेश सपकाळनितीन सोनवणेहारूण शेखशोएब शेखआतिक पठाणइम्रान पठाणहसनई शेखस्पर्धेचे आयोजक सोमनाथ आढावअनिरुद्ध काळेअमोल गिरमेसंकेत पारखे आदींसह सहभागी संघाचे खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे