समीर तांबोळी यांची मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राहाता शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल विविध पक्ष, संघटनांच्यावतीने सत्कार
समीर तांबोळी यांची मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राहाता शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल विविध पक्ष, संघटनांच्यावतीने सत्कार
अजिजभाई शेख
राहाता -येथील सामाजिक कार्यकर्ते तथा एवन फ्रुट सप्लाय चे संचालक समीर हाजी सलीमभाई तांबोळी यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राहाता शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल विविध राजकीय पक्ष,संस्था,संघटनांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादीचे इरफानभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार शाह मुश्ताकअली, राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष गुलशेरभाई शेख,फ्रुट चे सुप्रसिद्ध व्यापारी इलियासभाई पठाण, ऑर्गनायझेशनचे तालुकाध्यक्ष शौकतभाई तांबोळी,ज्येष्ठ पत्रकार तथा आरटीआय कार्यकर्ते अजिजभाई शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


यावेळी शाह मुश्ताकअली म्हणाले की समीरभाई तांबोळी यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राहाता शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी खुपच सोयीचे ठरणार असुन त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात ओबीसी प्रवर्गातील बंधू – भगीनींना शासन दरबारी येत असलेल्या अनेक विविध आडचणींच्या कामांना मार्ग मिळून शासनाच्या ओबीसी प्रवर्गासाठी असलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांचा त्यांना फायदा मिळणार आहे.याकरीता आमच्या सारख्या सामाजिक,राजकीय,माहिती अधिकार कार्यकर्ते तथा पत्रकार असे सर्वांचे पाठबळ त्यांना नेहमी आहेच व यापुढेही असणार आहे,यामुळे उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अधिक गतीने कामे हाती घ्यावी असेही ते म्हणाले.
तर सत्काराला उत्तर देताना समीरभाई तांबोळी म्हणाले की ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अन्सारी, जिल्हाध्यक्ष हाजी फयाजभाई बागवान,तालुकाध्यक्ष शौकत भाई तांबोळी आदींनी जी माझ्यवर जबाबदारी सोपवली आहे त्यास मी इमाने – ऐतबारे निभावण्याचा प्रयत्न करील, ओबीसी प्रवर्गासह सर्वच उपेक्षित घटकांना बरोबर घेऊन त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करील असेही ते म्हणाले.यावेळी इरफानभाई शेख, इलियासभाई पठाण,शाह मुश्ताकअली,गुलशेरभाई शेख,अकबरभाई शेख,समीरभाई कालुभाई शेख, इलियासभाई पठाण,समीर बेग,सादिक शहा, अजीजभाई शेख,आदि मान्यवर उपस्थित होते.


