महाराष्ट्र

उषाताई पवार यांचे यश गरीब व बहुजन समाजाला दिशा देणारे – पंडित भारुड सर

उषाताई पवार यांचे यश गरीब व बहुजन समाजाला दिशा देणारे – पंडित भारुड सर

कोपरगाव– कोपरगाव: तालुक्यातील सुभाष नगर भागातील उषाताई गंगाधर पवार या भगिनी राज्यसेवा आयोगाची परीक्षा चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाल्या. अत्यंत गरिब व प्रतिकूल परिस्थितीत उषाताई यांनी संघर्षातून मोठी घोडदौड केली आणि अख्या महाराष्ट्रात कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे . हे यश अद्वितीय आहे. अत्यंत दुर्बल परिस्थिती असतानाही गरिबी आणि संघर्ष याला आड येऊ न देता सतत जिद्दीने मेहनतीन अभ्यास करून अनेक वर्षाच्या परिश्रमाचे चीज करून उषाताईंनी शासकीय सेवेत पोलीस उपाधीक्षक हे पद मिळवले आहे याबद्दल सर्व समाजाला आनंद झाला असून कोपरगाव तालुक्याच्या विद्यार्थी व तरुणांना तरुण यांना उषाताईंना नवीन मार्ग दाखवला आणि प्रेरणा मिळवून दिली याबद्दल कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे संचालक तसेच सामाजिक कार्यकर्ते पंडितराव भारुड यांनी उषाताई यांच्या घरी जाऊन सत्कार केला, त्यावेळी त्यांनी उषाताईला शुभेच्छा दिल्या. उषाताईंनी सर्व कॉलेजचे विद्यार्थी आणि समाजातील मुला मुलींना आपण मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या अलौकिक भरीव यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे