ब्रेकिंग

शेतकरी प्रशिक्षण वर्ग उपक्रम संपन्न……

शेतकरी प्रशिक्षण वर्ग उपक्रम संपन्न……

सावळीविहीर/-राहाता तालुक्यातील कृषी संशोधन केंद्र सावळीविहीर फार्म व कृषी विभाग, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेवा संकल्प अभियान अंतर्गत माहेगाव देशमुख ता.कोपरगाव येथे नुकताच शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता सदर प्रशिक्षण वर्गात डॉ पी.एस.बेल्हेकर अधिकारी ,कृषी संशोधन केंद्र सावळीविहीर फार्म, पावसाच्या खंड काळात पिकांची नियोजन, तसेच रब्बी हंगामात गहू,हरभरा, तेलबिया पिकांचे नियोजन बाबत मोलाचे मार्गदर्शन केले तसेच नव्याने विकसित केलेल्या सुर्यफुलाचे, फुले अर्णव, संकरित वाणाची शेतकरी बांधवांना माहिती दिली . निफाड संशोधन केंद्राचे सहायक प्रा. डॉ पी .पी.खंडागळे यांनी कांदा पिकाचे उत्पादन बाबत माहिती दिली . श्रीमती टि.वाय.मोटे मंडल कृषी अधिकारी कोळपेवाडी, यांनी महीलासाठी कृषी विभागाच्या योजना तसेच शेतकरी महीला प्रमाणपत्र उपयुक्त मार्गदर्शन केले तसेच पी.जी. जाधव कोपरगाव उपकृषी अधिकारी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तसेच सतिश पद्माने सहाय्यक कृषी अधिकारी कोपरगाव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले सदरच्या कार्यक्रमात कृषी संशोधन केंद्र सावळी विहीर फार्मच्या विक्री केंद्रांत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विद्यापीठाच्या विविध उत्पादनांची माहिती कृषी सहाय्यक श्रीमती स्वप्नाली दातीर यांनी दिली तसेच शेतकरी बांधवांना विद्यापीठांचे फुले मायक्रो ग्रेड हे उत्पादन जागेवर उपलब्ध करून दिले या कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब भगुरे व संदिप भगुरे यांच्या फार्म हाऊसवर करण्यात आले होते या कार्यक्रमात सावळी विहीर सह पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व शेतकरी बांधवांने समाधान व्यक्त केले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे