आरोग्य व शिक्षण

संत ज्ञानेश्वर शाळेच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम

संत ज्ञानेश्वर शाळेच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम

संपादक:- रविंद्र जगताप

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेचा निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला असून यात कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा याही वर्षी राखली असून शाळेतील कुमार नरेश बाळासाहेब केकाण याने ९१.८० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के लागला असून विशेष म्हणजे तब्बल तेरा विद्यार्थ्यांनी ८५ टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये सार्थक कापडी ९०.८० टक्के रोहन दहे ९०.२० टक्के तनिष पैलवान ८९.१० टक्के,नकुल नरोडे ८९ टक्के,सोहम डिके ८७.६० टक्के,अतिक शेख ८६.१० टक्के या सर्व विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा तसेच कृतीयुक्त शिक्षण, वेळेचे योग्य नियोजन व विद्यार्थ्यांकडून पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून सराव करून घेतल्याने शाळेची गुणवत्ता उंचावली आहे व त्यामुळेच या शैक्षणिक वर्षात शाळेच्या प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र झावरे, सचिव किरण भोईर, विश्वस्त राजेंद्र सालकर,कैलास जाधव व विशाल झावरे तसेच शाळेच्या वतीने मुख्याध्यापक सचिन मोरे व सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे