महाराष्ट्र
कार्यकर्त्यांनी भाजपचा विचार व सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष अधिक बळकट करावा -स्नेहलताताई कोल्हे
कार्यकर्त्यांनी भाजपचा विचार व सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष अधिक बळकट करावा -स्नेहलताताई कोल्हे
कोपरगाव : प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या ब्रीदवाक्यानुसार यशस्वी वाटचाल करणारा, विकासाच्या प्रक्रियेत तळागाळातील लोकांना सामावून घेऊन भारताला जगात मानाचे स्थान मिळवून देणारा भारतीय जनता पक्ष हा देशातील एकमेव पक्ष आहे. भाजपला त्यागाचा आणि बलिदानाचा मोठा इतिहास आहे. कार्यकर्त्यांनी भाजपचा विचार आणि केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने जनतेच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून पक्ष अधिक बळकट करावा, असे आवाहन भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केले.भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस गुरुवारी (६ एप्रिल) कोपरगाव येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात स्नेहलताताई कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी स्नेहलताताई कोल्हे व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भारतमाता, थोर क्रांतिकारक जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.


भाजप स्थापना दिन व श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देऊन स्नेहलताताई कोल्हे याप्रसंगी म्हणाल्या, शामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५१ साली जनसंघाची स्थापना केली. स्वातंत्र्योत्तर काळात पंडित दीनदयाळ उपाध्याय, शामाप्रसाद मुखर्जी तदनंतर अटलबिहारी वाजपेयी आदींच्या माध्यमातून काँग्रेस पक्षासमोर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून त्या काळात जनसंघ पुढे आला. त्यानंतर ६ एप्रिल १९८० रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली जनसंघातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. भाजपच्या उभारणीत अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांचा मोठा हातभार आहे. भाजपने गेल्या ४३ वर्षांत खूप मोठा पल्ला गाठला आहे. एकेकाळी लोकसभेच्या दोन जागा जिंकणारा भाजप सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पूर्ण बहुमताने केंद्रात सत्तेत आहे. ‘अंधकार दूर होईल, सूर्य उगवेल आणि कमळ फुलेल,’ अशी घोषणा भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेवेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती. आता देशभरात भाजपचे ‘कमळ’ चांगलेच फुलले असून, कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर सदस्य संख्येच्या बाबतीत भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. सध्या केंद्रात व १२ राज्यांमध्ये भाजपचे सरकार असून, लोकसभेत भाजपचे ३०३, तर राज्यसभेत सुमारे १०० खासदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जगातील सर्वांत लोकप्रिय व शक्तिशाली नेते बनले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून, जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. राष्ट्रीय एकात्मता, मानवतावाद मूल्याधिष्ठित तत्त्व जोपासत, लोकशाहीला आत्मा समजून सर्वसामान्य लोकांसाठी कार्य करणारा भाजप हा केवळ एक पक्ष नसून एक विचार आहे. ‘सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास’ या त्रिसूत्रीवर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. अन्न सुरक्षा, जनधन योजना, शेतकरी सन्मान निधी योजना, उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत, सुकन्या योजना, महिलांना एसटी बसप्रवासात ५० टक्के सवलत यासारख्या केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सुरू केलेल्या योजनांचा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळावा, यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे. बूथ पातळीपर्यंत भाजपचे कार्य जोमाने सुरू आहे. आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असून, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपची विजयाची परंपरा कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन स्नेहलताताई कोल्हे यांनी केले. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांचा जनसेवेचा वारसा जपत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व आपण स्वत: कोपरगाव मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहोत. यापुढील काळातही कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुहाकडून समाजसेवेचा हा यज्ञ अखंड चालूच राहील. कार्यकर्त्यांनी व जनतेने या कामात कोल्हे परिवाराला अशीच कायमस्वरूपी साथ द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.प्रास्ताविक भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम तर सूत्रसंचालन भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी केले. यावेळी भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजयुमोचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजप शहराध्यक्ष दत्ता काले, न. प. तील माजी गटनेते रवींद्रअण्णा पाठक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, कैलास खैरे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, माजी नगरसेवक नयनकुमार ऊर्फ बबलू वाणी, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशालीताई आढाव, माजी नगरसेविका विद्याताई सोनवणे, मंगलताई आढाव, दीपाताई गिरमे, नारायणशेठ अग्रवाल, जयेश बडवे, वैभव गिरमे, अंबादास देवकर, सुनील देवकर, उत्तमराव चरमळ, कैलास रहाणे, विजय डांगे, अनिल शिंदे, सुरेश जाधव, विजय जामदार, राजेंद्र चांडे, विजय जाधव, हरिभाऊ लोहकणे, सुधाकर गाढवे,अंकुश कुऱ्हे, डॉ. गोरक्षनाथ मोरे, रवींद्र वल्हे, प्रशांत वाबळे, निखील औताडे, लक्ष्मीकांत संवत्सरकर, बापू वाणी, नसीरभाई सय्यद, रिपाइं नेते जितेंद्र रणशूर, पिंटू नरोडे, शिवाजीराव खांडेकर, प्रसाद आढाव, खालिकभाई कुरेशी, अल्ताफभाई कुरेशी, संजय जगदाळे, राजेंद्र बागुल, दादासाहेब नाईकवाडे, महेश खामकर,सुशांत खैरे, रवींद्र लचुरे, वैभव आढाव, सचिन सावंत, रवींद्र रोहमारे, फकिर मोहम्मद पहिलवान, देवराम पगारे, सलीम पठाण, सतीश रानोडे, जयप्रकाश आव्हाड, अनिल गायकवाड, हाशमभाई, शफिक सय्यद, हुसेन सय्यद, संतोष साबळे, गोपीनाथ गायकवाड, रवींद्र नरोडे, शरद त्रिभुवन, सिद्धू भाटिया, गजू खिलारी, बापू पवार, सलीम मन्सुरी, अंकुश जोशी, अण्णा खरोटे, मुन्ना दरपेल, रज्जाक पटेल, किरण सुपेकर, विक्की सोनवणे, नरेंद्र लकारे, राहुल सूर्यवंशी, चंद्रकांत वाघमारे, रोहन दरपेल, गोपीनाथ सोनवणे,प्रभुदास पाखरे, कैलास गवारे, विजयराव चव्हाणके, आशिष उदावंत, अय्युब बागवान, रमेश भोपे आदींसह भाजप, भाजयुमो व रिपाइं (आठवले गट) चे पदाधिकारी, भाजप बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, विविध संस्थांचे आजी-माजी संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी पुंजाभाऊ राऊत, हरिभाऊ लोहकणे, सुधाकर गाढवे, रवींद्रअण्णा पाठक, कैलास खैरे, प्रभाकर आव्हाड, सुशांत खैरे, जयेश बडवे, नसीरभाई सय्यद, वैभव आढाव आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजप स्थापना दिनानिमित्त स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



