महाराष्ट्रसामाजिक

कोपरगावातील रखडलेल्या शासकीय इमारतींच्या उद्घाटनाची मागणी

कोपरगावातील रखडलेल्या शासकीय इमारतींच्या उद्घाटनाची मागणी

कोपरगावकरांनी विधान परिषद सभापतींकडे निवेदन सादर

कोपरगाव | प्रतिनिधी :-कोपरगाव शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या शासकीय इमारती तातडीने सुरू करण्यात याव्यात, अन्यथा नागरिक व पोलिसांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशारा देत “माझं गाव माझा अभिमान – कोपरगावकर” या उपक्रमाच्या वतीने विधान परिषद सभापती भारामजी शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

जाहिरात ज्योती
जाहिरात

कोपरगाव शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशनची नवी इमारत, पोलीस निवासस्थान तसेच कोपरगाव नगर परिषदेची नवी इमारत या सर्व इमारती पूर्ण होऊनही अनेक महिन्यांपासून धूळखात बंद अवस्थेत पडून आहेत. विशेष म्हणजे, सध्या वापरात असलेली ग्रामीण पोलीस स्टेशनची जुनी इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, ती कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस बांधवांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या निवेदनासोबत संबंधित जुन्या व नव्या इमारतींचे छायाचित्रेही जोडण्यात आली असून, तात्काळ उद्घाटन करून या इमारती जनतेच्या सेवेसाठी खुल्या कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे संभाव्य जीवितहानी टळेल तसेच शहरातील नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता अबाधित राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मागणीसाठी भरत मोरे, अनिल गायकवाड, विनय भगत आणि विजय जाधव यांनी स्वाक्षऱ्या करून कोपरगावकरांच्या भावना सभापती महोदयांपर्यंत पोहोचवल्या आहेत.आता प्रशासन व लोकप्रतिनिधी याबाबत काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण कोपरगाव शहराचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे