सामाजिक कार्यकर्ते निसार भाई शेख राज्यस्तरीय वृक्ष मित्र पुरस्काराणे सन्मानित
सामाजिक कार्यकर्ते निसार भाई शेख राज्यस्तरीय वृक्ष मित्र पुरस्काराणे सन्मानित
संपादक:- रविंद्र जगताप



ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सण 2022 23 पुरस्कार सन्मान सोहळा कोपरगाव येथील हॉटेल विरा पॅलेस या ठिकाणी आयोजीत करण्यात आला होता आंतरराष्ट्रीय धावपट्टू मोनिका जी आथरे ह्या प्रमुख पाहुणे होते सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर राहणारे सामाजिक कार्यकर्ते निसार भाई शेख यांना मोनिका ताई यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय वृक्ष मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

निसारभाईंचे सामाजिक कामात भरीव योगदान तर आहेच परंतु त्यांना निसर्ग प्रेमी, वृक्ष प्रेमी,पक्षी प्रेमी म्हणून देखील ओळखले जातेमागील शिवजयंतीच्या निमित्ताने 500 वृक्ष वाटप त्यांनी केले होते तसेच कोपरगाव शहरात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता पिण्यासाठी 20 दिवसाआड पाणी मिळत होते त्या वेळेस त्यांच्या भागातील पालिकेने रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाड जळून जाण्याच्या मार्गावर असतांना निसार भाईंनी स्वखर्चाने टँकर द्वारे त्या झाडांना पाणी घालून ती झाडे वाचविण्याचे काम मागच्या काळात केलेले आहे व ती झाडे आज अभिमानाने डवलत आहे
ग्रामीण भागात देखील अनेक ठिकाणी त्यांनी स्वतः वृक्षारोपण केले आहे कब्रस्थान, मदरसा या ठिकाणी ही त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग नोंदविला आहे या मुळेच त्यांना राज्य स्तरीय वृक्ष मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले आहे या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आशुतोष दादा काळे साहेब, कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब, सौ देसले मॅडम, राजेंद्र पंडित बापू जाधव, पत्रकार मानिशजी जाधव, अध्यक्ष सोमनाथ डफाळ आदि उपस्थित होते


