ब्रेकिंग

कोपरगांव तालुका शालेय कुस्ती स्पर्धा यशस्वीपणे संपन्न

कोपरगांव तालुका शालेय कुस्ती स्पर्धा यशस्वीपणे संपन्न

संपादक:- रवींद्र जगताप

महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचालनालय, पुणे.. जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर..तालुका क्रीडा समिती कोपरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय कुस्ती स्पर्धा दिनांक 23 व 24 ऑगस्ट रोजी कोकमठाण येथिल आत्मा मालीक कुस्ती केंद्र येथे घेण्यात आल्या.. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रार्थनीय आत्मा मालीक ध्यान पिठाचे मा. संत योगानंदजी महाराज, संत महिंदकर महाराज, मा.बाळासाहेब पाटील उपस्तीत होते.

जाहिरात

संपूर्ण तालुक्यातून १२० मुले व ३० मुली असे १५० स्पर्धक सहभागी झाले होते.. या वेळी कोपरगांव तालुका क्रीडा समिती अध्यक्ष नितीन निकम, जिल्हा संपर्क प्रमुख शिवप्रसाद घोडके, प्रा. मिलिंद कांबळे, प्रा. कदम,भीमाशंकर औताडे, निलेश बडजाते, किरण बोळींज, महीला प्रतिनिधी अस्मिता रायते, संजय आमोलिक, वसावे, सचिन जाधवआदी क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन आत्मा मालीक कुस्ती केंद्राचे राष्ट्रीय पंच,NIS विवेक नायकल यांनी त्यांच्या सहकारी क्रीडा शिक्षक मार्गदर्शक यांच्या सहकार्याने केले होते..

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे