रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची कोपरगाव तालुक्यामध्ये भव्य दिव्य मीटिंग संपन्न

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची कोपरगाव तालुक्यामध्ये भव्य दिव्य मीटिंग संपन्न
संपादक रविंद्र जगताप
कोपरगाव शहरात ६ मार्च २०२३ रोजी व्यापारी धर्मशाळा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची भव्य दिव्य अशी मीटिंग संपन्न झाली.या मीटिंगमध्ये राज्याचे उपाध्यक्ष श्रीकांतजी भालेराव साहेब तथा संपर्कप्रमुख अहमदनगर त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात अहमदनगर प्रमुख विभागीय भीमा भाऊ बागुल कोपरगाव तालुका अध्यक्ष अनिल भाऊ व कोपरगाव तालुकाध्यक्ष महिला वैशालीताई सोनवणे त्याच बरोबर राहता युवक अध्यक्ष करण भाऊ कोळगे कोपरगाव चे युवा नेते प्रदीप भाऊ गायकवाड व राहता तालुका संघटक विद्रोही सत्यजित कोळगे आणि अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळेस या मीटिंगमध्ये अनेक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्रीकांत जी भालेराव साहेब व दीपक भाऊ गायकवाड व सुरेंद्र भाऊ थोरात व भीमा भाऊ बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली.महिला उपजिल्हाध्यक्ष म्हणून सौभाग्यवती वैशालीताई सोनवणे यांची निवड करण्यात आली.आणि फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करणारे आमचे परममित्र राहुल विलास सोनवणे यांची कोपरगाव तालुका दक्षिण उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. व यावेळेस अनेक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.आजच्या मिटींगला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. भविष्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नक्कीच अहमदनगर जिल्ह्यात बळकट बनत आहे.आज या पदाधिकाऱ्यांची निवड झाली मी त्यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो व त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो…असं त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो..व पक्षाचे काम घडो.असे प्रतिपादन विद्रोही सत्यजित कोळगे (राहता तालुका संघटक) यांनी याप्रसंगी केले आहे.




