कृषीवार्ता

‘ माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विभागीय शेतकरी मेळावा रवंदे येथे संपन्न ‘

‘ माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विभागीय शेतकरी मेळावा रवंदे येथे संपन्न ‘
संपादक:- रविंद्र जगताप
माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त सहकार रत्न शेतकरी सहकारी संघ ली.कोपरगाव यांच्या विद्यमाने आयोजित विभागिय शेतकरी संवाद मेळावा प्रसंगी ऊस पिकावर ड्रोन यंत्रा द्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिक रवंदे येथे संपन्न झाले.या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह.साखर कारखाना चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रसिद्धी हवामान तज्ञ पंजाबराव डख,अमूल्या ऍग्रोटेक राहुल मुगदुम यांचे मार्गदर्शन लाभले.शेती ही व्यवसाय म्हनून पाहणे गरजेचे आहे.शेतकरी हा स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या केंद्रस्थानी कायमच राहिले आहेत.उच्चशिक्षित व अमेरिकेत शिक्षण झाल्यानंतर आपल्या भागांतील नागरिकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती देऊन कोपरगाव आणि महाराष्ट्रातील जडणघडण होण्यात आपले योगदान साहेबांनी दिले त्यांच्या जयंतीनिमित्ताने शेतकरी संवाद मेळावा ही प्रेरणादायी बाब आहे.
आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करावी,शेतीला पूरक दुग्धव्यवसाय वाढवावा.कमी जागेत व उपलब्ध पाण्यात अधिक उत्पादन कसे घ्यावे ही दिशा साहेबांनी शेतकरी बांधवाना दिली.कारखाना,गोदावरी दूध संघ,बँक,पतसंस्था,शैक्षणिक संस्था,शेतकरी हिताच्या संस्था स्थापन केल्या.संजीवनी दूध डेअरीच्या माध्यमातून मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी कामकाज सुरू केले त्यावेळी महिलांच्या नावे दुधाचे पैसे वर्ग करण्याचा सल्ला साहेबांनी दिला कारण घरातील महिला ही आर्थिक नियोजन उत्तम करू शकते हा संदेश यातून दिला.स्व.कोल्हे साहेब परिवहन मंत्री असतांना त्यांनी बस मध्ये महिलांसाठी राखीव जागेचा निर्णय घेतला.हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अचूक माहितीमुळे अनेकांचे नुकसान टळते व शेतीचे अचूक नियोजन करणे शक्य होते त्यामुळे अशा लोकोपयोगी सेवा देणाऱ्या तज्ञ अभ्यासकाला कारखान्याच्या वतीने मानधन दिले जाणार आहे असे विवेकभैय्या कोल्हे यांनी जाहीर केले.हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सहकार महर्षी कोल्हे कारखाना हा ड्रोन तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन आधुनिक शेतीकडे वळवनारा कारखाना आहे,या ड्रोन सुविधेच्या उपलब्धतेची नोंद सुवर्ण अक्षरांनी होईल.माजी मंत्री स्व.कोल्हे साहेबांच्या दूरदृष्टीने आधुनिकीकरणाची उपलब्धी शेती विकासाच्या दृष्टीने मोलाची आहे.पंजाबराव डख यांनी पुढे बोलताना हवामान विषयक अचूक अंदाज कसे बांधावे,शेतीचे वेळापत्रक तयार करून पीक नियोजन करावे याची माहिती शेतकरी बांधवांना दिली.संजीवनी समृद्धी योजनेद्वारे सवलतीच्या दरात संजीवनी सेंद्रिय खत व सेंद्रिय गंधक हे सवलतीच्या दरात देणार आहे.एप्रिल पासून उत्पादन वाढीसाठी उपक्रम हाती घेतला जाणार असून शेतकी विभागाचे प्रतिनिधी थेट बांधावर जाऊन सर्व प्रक्रिया करण्यासाठी मदत करणार आहेत डिजीसीए मान्यताप्राप्त अप्रुव्हड ड्रोन ज्याला केंद्र शासनाचे 40% अनुदान मिळते त्या व्यतिरिक्त शेतकरी बांधवानी अथवा विविध सेवा संस्थांनी जर तो ड्रोन घेतला तर सहकार महर्षी कोल्हे कारखाना एकरी दीड लाख रुपये अनुदान देणार आहे.शेतकरी बांधवाना या बद्दल नोंदणीसाठी विस्तृत माहिती प्रसिद्ध केली जाईल.
स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेती,पाणी,वीज,रस्ते आणि सर्वांगीण विकास यासाठी वेचले आहे.त्यांच प्रेरणेने संपूर्ण कोल्हे कुटूंब काम करत आहे.
या प्रसंगी दत्तूनाना कोल्हे,शिवशंकर सोसायटीचे चेअरमन साहेबराव कदम, कारखाना व्हा. चेअमन रमेशराव घोडेराव,सहकार रत्न शेतकरी संघाचे चेअमन अंबादास देवकर,व्हा.चेअरमन बाजीराव मांजरे,सोपानराव कदम, संभाजीराव गावंड,केशवराव भवर,ज्ञानेश्वर परजणे,मनेष गाडे,विलासराव माळी, बापूसाहेब बारहाते,फकीराव बोरनारे, निलेश देवकर,साहेबराव रोहम,भाऊसाहेब भाकरे,सुनील देवकर,जयराम गडाख,बिच्छू नाना जाधव,भाऊसाहेब कदम,डॉक्टर राजकुमार दवंगे,सोपानराव कुंभार, रोहिदास साळुंखे ,विजयराव जाधव, बाळासाहेब अहिरे,धोंडीबा सांगळे, जयराम सांगळे, रघुनाथ फटांगरे, माधवराव गोसावी, शांताराम कदम, सुभाष कंक्राळे, संजय बोडके,संजय सानप, कैलास येवले, गोरक्षनाथ देवकर, बबनराव निकुंभ,सतीश बडवर, नंदलाल जगझाप,सुदामराव गाडे, वाल्मिकराव भिंगारे,नारायण दादा जाधव, भानुदास भवर,नामदेव गायकवाड,साहेबराव लामखडे, राजेंद्र देवकर,संदीप गुर्वे,अविनाश काटे,लोहकरे साहेब,रंजनाताई आढाव आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व विविध संस्थाचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे