महाराष्ट्र

पाणी प्रश्नासाठी लढा देणार्यां सर्वाचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी मानले आभार

पाणी प्रश्नासाठी लढा देणार्यां सर्वाचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी मानले आभार

जल है तो जीवन है,कोपरगावकरासाठी   पाणी प्रश्न खुप महत्वाचा आहे .काल १३१  कोटी रुपये, येसगाव येथील ५ नंबर साठवण तळ्याच्या कामा साठी  मंजूर झाले. आत्ता टेंडर होईल व काम चालू होईल.हे सर्व केवळ ज्या सर्वांनी या आंदोलनात कळत न कळत सहकार्य केले ,व वेगवेगळ्या मार्गाने सहभाग नोदविला.तसेच ” कोपरगाव पाणी संघर्ष समितीच्या या सर्व सदस्यांचे खऱ्या अर्थाने योगदान लाभले कोपरगाव च्या इतिहासात या आंदोलनाला प्रथम समाज निहाय पक्ष विरहित  लोक पुढे आले , वेगवेगळ्या संघटना , ( वकील संघ ) सामाजिक कार्यकर्ते , विशेष करून महिला भगिनीनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन पाठिंबा दिला.कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघटना सह इतर पत्रकार संघटनेने ही कोपरगाव च्या इतिहासात पहिल्यादा या पाण्याच्या आंदोलनाला ला पाठींबा दिला होता . शेवट पर्यंत हा लढा चालू राहिला.शेवटी ४ वर्षा नंतर यश आले.हा लढा , हे आंदोलन आपण सर्वांनी आपल्या साठीच , आपल्या गावासाठी , पुढच्या पिढी साठी , घरच्या माताभगिनीं साठी केले.सर्वांच्या मुळे हा प्रश्न मार्गी लागला.यात ज्या व्यक्तींनी सहकार्य केले त्यांचे सर्वाचे आभार.माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी मानले आहे.जनतेच्या  मागणी प्रमाणे पाठ पुरवठा करुन  पाणीप्रश्न तडीस नेला व पैसे मंजूर करून आणले.त्याबद्दल  मा. नामदार.आशुतोष दादा काळे साहेब यांचे विशेष आभार  देखील  माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी मानले आहे.         तसेच नगराध्यक्ष , नगरपालिका प्रशासन , प्रांत , तहसीलदार , पोलीस प्रशासन , महाराष्ट्र शासन , विशेष करून कोपरगाव चे सर्वे सनमाननीय.पत्रकार बंधू चे विशेष करून आभार , त्यांच्या सहकार्या शिवाय हे शक्य नव्हते असे दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात मा.नगराध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे