राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात होणार साजरी
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी :- श्री संत सदगुरु जनार्दन स्वामी ( मौनगिरी) महाराज समाधीस्थान व श्री काशी विश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्ट बेट कोपरगाव येथे भव्य गुरुपोर्णिमा उत्सव दि. १३/०७/२०२२ रोजी साजरा करण्यात येणार आहे. सदर उत्सव साजरा करण्याबाबत मठाधिपती प.पु. स्वामी रमेशगिरीजी महाराज व विश्वस्त मंडळाने संपूर्ण तयारी केलेली सदर कार्यक्रमासाठी प.पु. श्री संत सदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी मंदिरात आतील बाजूस लाईट फिटिंग, कलर, काम सुरु आहेत. तसेच काशी विश्वनाथ मंदिराला देखील लाईट फिटिंग करून मंदिराचे संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहेत. अन्नछेत्राचे पण काम सुरु आहे. गुरुपोर्णिमा उत्सवा करिता विश्वस्त मंडळाने भाविकांचे मदतीने ५०. क्विंटल बुंदी व ५० क्विंटल मसाले भात महाप्रसाद म्हणून तयार करून वाटप करणार आहे. श्री गुरुपोर्णिमा उत्सव निमित्त समाधीस्थान परिसरात विद्युत रोषणाई, मंडप डेकोरेशन, समाधी मंदिर सजावट इ. काम चालू आहेत. दि. १३/०७/२०२२ रोजी गुरुपोर्णिमा उत्सवाचे दिवशी पहाटे ४.०० वाजता नित्यनियम विधी व महासमाधीस्थान व पूजन सकाळी ८.०० वाजता बाबाच्या पादुकाची पाठ्य पूजा भक्त निवास मध्ये होईल तसेच १०:०० वाजता प्रमुख साधूसंतांची प्रवचने होतील व तदनंतर १२.०० वाजता महाप्रसाद वाटप होईन, वरील सर्व कार्यक्रमप.पु. स्वामी रमेशगिरिजी महाराज, प.पू.स्वामी मधुगिरीजी महाराज, प.पु. स्वामी माधवगिरिजी महाराज, प.पु. स्वामी दत्तगिरिजी महाराज व भाऊपाटील त्र्यंबकेश्वर याचे प्रमुख उपस्थित होईल अशी माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष श्री दत्तात्रय बाळकृष्ण होळकर सर यांनी दिली. या प्रसंगी ट्रस्ट चे उपाध्यक्ष विलासराव यादवराव कोते, सचिव अवादास दादा अत्रे, विश्वस्त त्र्यंबक कुष्णाजी पाटील, रामकृष्ण बंडूजी कोकाटे, अनिल बाप्पासाहेब जाधव, संदीप मोहनराव चव्हाण, आशुतोष विलासराव पानगव्हाणे, अतुल बाबुराव शिंदे, शिवनाथ सुभाषराव शिंदे सर्व विश्वस्त उपस्थित होते



