गुन्हेगारी

विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी तब्बल ६ वर्षांनतर शिक्षकावर गुन्हा

विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी तब्बल ६ वर्षांनतर शिक्षकावर गुन्हा

कोपरगाव :- शाळेत उशिरा आल्याने दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीस शिक्षकाने मारहाण केल्यामुळे या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी कोपरगाव न्यायालयाच्या आदेशाने सहा वर्षांनंतर संबंधित शिक्षकाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला. पढेगाव येथील चारी नंबर ४५ जिल्हा परिषद शाळेत तृप्ती भोसले ही दुसरीत शिकत होती. १ एप्रिल २०१८ रोजी ती शाळेत उशिरा पोहोचली. त्यामुळे शिक्षक सुनील हंडे वय ४२, रा. निवारा, कोपरगांव याने तृप्तीला वर्गाबाहेर उभे करून मारहाण केली. छातीत धक्का दिल्याने ती पायऱ्यांवरून खाली पडली, यात तिला दुखापत झाली होती. तिला उपचारासाठी कोपरगाव येथे आणण्यात आले. येथे तिची प्रकृती बिघडल्याने तृप्तीला लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला होता.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे