ब्रेकिंग

स्वच्छता गृहाच्या मागणी साठी नगर पालिकेत सामूहिक मूत्र विसर्जन आंदोलन

स्वच्छता गृहाच्या मागणी साठी नगर पालिकेत सामूहिक मूत्र विसर्जन आंदोलन
(कोपरगाव)कोपरगाव शहरातील मुख्य चौकात महिला व पुरुषासाठी स्वच्छता गृह बांधावे या मागणी साठी सर्व सामान्य नागरिक व बाजार पेठेतील व्यापारी यांच्या समवेत लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने नगर पालिका आवारात प्रतिकात्मक सामूहिक मूत्र विसर्जन आंदोलन करण्यात आले आहे अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड.नितीन पोळ यांनी एका निवेदनाद्वारे नगर पालिकेला केली
आपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहरात मूख्य रस्त्या लगत पुरुषांसाठी स्वच्छता गृहे होती मात्र विकास कामाच्या गदारोळात ही स्वच्छता गृहे नगर पालिकेने काढून टाकले तसेच लोक शाहीर अण्णा भाऊ साठे नाट्य गृहाच्या बाजूला असलेले स्वच्छता गृहा शेजारी नवीन इमारतीचा पाया खोदत असताना आठ दिवसापूर्वी पडले मात्र त्यामुळे परिसरातील नागरिक व व्यापारी यांची मोठी हाल होत आहे तसेच महिला करिता एवढ्या मोठ्या शहरात भाजी मार्केट मध्ये एकमेव स्वच्छता गृह आहे
अनेक व्यापारी व नागरिक यांनी वारंवार नगर पालिके कडे स्वच्छता गृहाची मागणी केली मात्र आठ दिवस झाले तरी नागरिक, व्यापारी यांच्या मागणीकडे नगर पालिका अक्षम्य दुर्लक्ष करत असून आज रोजी कोपरगाव शहरातही महिला व पुरुषांना लघवी करण्यासाठी स्वच्छता गृह त्वरित बांधावे या मागणी साठी कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने नगर पालिका आवारात प्रतिकात्मक
*”सामूहिक मूत्र विसर्जन”* आंदोलनाचे आयोजन करण्यात आले
या आंदोलनात आंदोलक प्लास्टिक बाटली घेऊन त्यात प्रतिकात्मक मूत्र घेऊन नगर पालिका आवारात गेले सदरचे निवेदन उपमुख्य अधिकारी चाकने साहेब यांना देण्यात आले
या आंदोलनास शिव सेनेचे भरत मोरे, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे संतोष गंगवाल, शेतकरी कृती समितीचे तुषार विध्वंस,उमेश धुमाळ,भूमी पुत्र फाउंडेशन चे निसार शेख, भोई समाज संघटनेचे अर्जुन मोरे,शफीक सय्यद,काँग्रेसचे नितीन शिंदे,गिरीधर पवार, सुनील दवंगे,अफजल मौलाना,चंद्रशेखर आढाव, अमित खोकले, व्यापारी बांधव तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते

 

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे