ब्रेकिंग

के.जे.सोमैया महाविद्यालयातील मयत झालेल्या विद्यार्थीनीच्या परिवारास एक लाख रुपयाचा विद्यार्थी अपघात सुरक्षा विमा धनादेश मंजूर…

कोपरगांव: स्थानिक के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थीनी प्रगती मधुकर होन हिचे काही दिवसापूर्वी ऑटोरिक्शा व कंटेनरच्या भीषण अपघातात निधन झाले होते. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पालकत्व हे खऱ्या अर्थाने महाविद्यालयाचे असते व हाच संदेश प्रमाण मानून संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य  व सर्व सेवक विद्यार्थ्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत असतात. महाविद्यालयाची द्वितीय वर्ष कला शाखेत शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी प्रगती ही बस संप काळात नेहमीप्रमाणे सकाळी महाविदयालयात येत असतांना तीचे अपघाती निधन झाले होते. सदर घटनेचा वृत्तांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ विभागास महाविद्यालयातर्फे तात्‍काळ कळविण्यात आला होता व त्‍यांच्‍या मार्गदर्शनानुसार दि ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड, ठाणे या विद्यार्थी अपघात सुरक्षा विमा कंपनीस सदर प्रस्ताव कागदपत्राची पूर्तता करून पाठविण्यात आला होता. या विमाकंपनी कडून मंजूर झाालेला एक लाख रुपयाचा धनादेश संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांच्या हस्ते मयत विद्यार्थीनीचे वडील श्री. मधुकर होन व नातेवाईक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी संदीप रोहमारे म्हणाले कि ‘प्रगती सारख्या सुसंस्कृत व हुशार विद्यार्थीनीच्या निधनाने आम्हा सर्वास अतीव दुःख झालेले आहे. आपल्या महाविद्यालयात ग्रामीण भागातुन येणाऱ्या विद्यार्थीनींची संख्या अधिक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच आपतकालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांमागे ठामपणे उभे रहाणे हे महाविद्यालयाचे कर्तव्य आहे.’ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी याप्रसंगी विद्यापीठ व विमा कंपनीचे विशेष आभार मानले. विद्यार्थी अपघात सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मयत निधी मिळणेकामी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे, कार्यालयीन सहाय्यक श्री. मनोज परदेशी तसेच दि ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी लिमिटेडचे दावा तपास अधिकारी श्री. राजेश लोंढे यांचे विशेष सहकार्य झाले. धनादेश वितरण करतेवेळी सिनेट सदस्य प्रो. के.एल.गिरमकर, महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.संजय दवंगे, प्रबंधक डॉ.अभिजीत नाईकवाडे, श्री.आबासाहेब कोकाटे, श्री.संजय पाचोरे, श्री.अविनाश पवार हे उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे