महाराष्ट्र

अन्नदाता ते ऊर्जादाता : संजीवनीच्या सीएनजी प्रकल्पामुळे आत्मनिर्भरतेकडे मोठे पाऊल : विवेकभैय्या कोल्हे

अन्नदाता ते ऊर्जादाता : संजीवनीच्या सीएनजी प्रकल्पामुळे आत्मनिर्भरतेकडे मोठे पाऊल : विवेकभैय्या कोल्हे
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असताना भारताने मात्र सक्षम नेतृत्वामुळे स्थैर्य टिकवून ठेवले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्ट्रॅटेजिक इंधन साठ्यांमुळे देशात इंधनटंचाई किंवा मोठी दरवाढ होण्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही. तरीही भविष्यातील संभाव्य आव्हानांचा विचार करता भारताने ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज असल्याचे मत कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केले.
देशात मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑइल आणि सीएनजीसारखे इंधन परदेशातून आयात केले जाते. विशेषतः स्ट्रीट ऑफ होर्मुझ या महत्त्वाच्या समुद्री मार्गातून मोठ्या प्रमाणावर इंधन भारतात येते. गेल्या वर्षभरातील आकडेवारीनुसार जवळपास साडेपाच हजार जहाजांमधून इंधन भारतात आयात करण्यात आले असून त्यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी पर्यायी ऊर्जा स्रोत निर्माण करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे