सोमैया महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम उत्साहात

महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना स्टुडन्ट इंडक्शन प्रोग्राम मध्ये मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.(डॉ)विजय ठाणगे व समवेत व्यासपीठावर प्रा.डॉ. रवींद्र जाधव प्रा.डॉ. संजय आरगडे प्रा.डॉ. वसुदेव साळुंके, प्रा.डॉ.गणेश शिंदे व प्रा.डॉ संतोष पगारे आदी.
सोमैया महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम उत्साहात
कोपरगाव दिनांक :”महाविद्यालय हे विद्यार्थ्यांचे दुसरे घर असते तर शिक्षक हे त्यांच्या पालकांची भूमिका करीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेताना शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन आयुष्यात यशस्वी वाटचाल करावी. उच्च शिक्षण घेत असताना विद्यापीठीय अभ्यासक्रम मन लावून पूर्ण करावा, त्याचबरोबर आपल्या आचरणातून शिष्टाचार, जीवनमूल्ये यांचाही अंगीकार करावा.” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी केले. स्थानिक के जे सोमैया वरिष्ठ व के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व मेंटॉरिंग विभागाच्या वतीने आयोजित इंडक्शन प्रोग्राम मध्ये प्राचार्य डॉ. ठाणगे बोलत होते.

याप्रसंगी प्रथम वर्ष या वर्गाला प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक विज्ञान, डाटा सायन्स, ए. आय.व एम. एल. या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर विभागाचे प्रमुख डॉ. वसुदेव साळुंके यांनीही प्रास्ताविक करताना मेंटॉरिंगचा उद्देश स्पष्ट करीत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. गणेश शिंदे, डॉ. रवींद्र जाधव यांनीही क्रमशः परीक्षा विभाग व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागांच्या अनुषंगाने उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कला शाखेचे प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे, वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉ. संतोष पगारे, डॉ. सुरेश देवरे, प्रा. सदाशिव नागरे,प्रा. सचिन जाधव, प्रा. जगधने, प्रा. पडघडमल प्रा. गुडघे, प्रा. सुभाष सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या इंडक्शन प्रोग्रामसाठी प्रथम वर्ष कला वाणिज्य विज्ञान आदी शाखांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. इंडक्शन प्रोग्राम चे सूत्रसंचालन स्टाफ सेक्रेटरी डॉ. संजय अरगडे यांनी केले.

संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/JcX8YoNk9gs6W6YGtE20ZI?s=cl&p=a&ilr=0&amv=2
बातम्यासाठी 9175751349 हा नंबर आपल्या व्हाटसाँप ग्रुपला अँड करा
संपादक रवींद्र जगताप


