कोपरगाव पुणतांबा सकाळी 8/30 रिटन एसटी बस सुरू करा. पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांची मागणी

कोपरगाव पुणतांबा सकाळी 8/30 रिटन एसटी बस सुरू करा. पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांची मागणी
कोपरगाव परीवहन महामंडळाचा गलथान कारभार सकाळी 8/30 वाजता कोपरगाव हुन पुणतांबा येथे येणारी रिटन बस बंद झाल्याने पुणतांबा रुटवरील शिंगवा कोकमठाण रस्तापुर पुणतांबा सडे फाटा येथील शालेय.कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनी हे मोठ्या संख्येने कोपरगाव श्रीरामपूर येथे विविध विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जात असतात कोपरगाव रिटन सकाळची बस गेली मे महिन्याच्या दोन तिन महिने झाले बंद असुन त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असुन तसेच शालेय कॉलेज वर्गाचे अभ्यासक्रमाचा सकाळचे सत्र गैरहजरी मुळे मोठे नुकसान होत आहे.तरी सकाळ ची रिटन बस लवकर सुरू न झाल्यास पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी हे कोपरगाव आगारप्रमुख यांना शिवसेना पदाधिकारी यांचे सह विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे सह घेराव आंदोलन करुन जाब विचारणार आहे तसेच परीवहन मंत्री प्रताप सरनाईक कोपरगाव तालुक्यातील आ विवेकभैय्या कोल्हे आ आशुतोष काळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी लक्षवेधणार असुन या नंतर ही हा प्रश्न सुटला नाही तर पुणतांबा येथे विक्रमचौक आशाकेंद्र चौकात कुठलीही पुर्व सुचना न देता रुटवरील सर्व शालेय कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनी पालकासह तसेच अन्य प्रवासी यांच्या सह रास्तारोको करुन एसटी महामंडळाच्या बस धावु देणार नाही याची सर्वशी जबाबदारी परीवहन महामंडळ व कोपरगाव एसटी बस डेपो ची असेल असा इशारा पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी दिला आहे* *शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवासेनाप्रमुख अदित्यसाहेब ठाकरे यांचे कडे या प्रश्नावर झोपेचे सोंग घेतलेल्या परीवहन महामंडळाला जागे करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने त्रिव आंदोलना बाबद चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले





