एस. एस. जी. एम. महाविद्यालयात वाणिज्य शाखेचा पालक मेळावा उत्साहात संपन्न

एस. एस. जी. एम. महाविद्यालयात वाणिज्य शाखेचा पालक मेळावा उत्साहात संपन्न
कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयाच्या ११ वी तसेच १२ वी वर्गाच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा पालक मेळावा प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. पालक मेळाव्याचे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले.

यावेळी विविध प्राध्यापकांनी पालक आणि विद्यार्थी यांना आपले विभाग,विषय आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी उपप्राचार्य श्री.रविंद्र हिंगे, श्रीम. प्रज्ञा वर्पे, श्री. माधव रेवगडे यांनी महाविद्यालयीन शैक्षणिक उपक्रमांबद्दल माहिती दिली. पालक प्रतिनिधी श्री.किरण मराठे, सौ. प्रीती थोरात, सौ. मनीषा ढवळे, श्री. एकनाथ संवत्सरकर यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना मांडून आपले मनोगत व्यक्त केले..

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “आजच्या बदलत्या काळात विद्यार्थी-पालक परिसंवादाची गरज अधिक वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महाविद्यालय आणि पालक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद असणे आवश्यक आहे. वाणिज्य शाखा ही केवळ आर्थिक विचार शिकवणारी शाखा नसून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, आर्थिक साक्षरता आणि स्वावलंबनाची भावना निर्माण करणारी शाखा आहे”, असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व प्रमुख पाहुण्यांचा परिचय वाणिज्य विभाग प्रमुख श्री. शांतीलाल अग्रवाल यांनी करून दिला. मेळाव्यासाठी पालक, विद्यार्थी कनिष्ट विभागातील शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भगवान ढगे व श्रीम.ज्योती लामखडे यांनी केले, तर आभार श्री.सुशील सोनोने यांनी मानले.
संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/JcX8YoNk9gs6W6YGtE20ZI?s=cl&p=a&ilr=0&amv=2
बातम्यासाठी 9175751349 हा नंबर आपल्या व्हाटसाँप ग्रुपला अँड करा
संपादक रवींद्र जगताप


