ब्रेकिंग

जिल्हा परिषद चापडगाव शाळेचे उपक्रमशील शिक्षक कवी डॉ गवाजी बळीद यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

जिल्हा परिषद चापडगाव शाळेचे उपक्रमशील शिक्षक कवी डॉ गवाजी बळीद यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

*शेवगाव तालुक्यातील चापडगाव जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक कवी डॉ गवाजी बळीद यांना सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुखी समृद्ध जीवनासाठी एक विद्यार्थी एक झाड ,पक्षांसाठी मूठभर दाणे वाटीभर पाणी, माझी परसबाग ,पर्यावरण संवर्धन ,वृक्षसंगोपन, व्यसनमुक्ती ,जलसाक्षरता, बालआनंदी बाजार ,शिक्षक कवी संमेलन, बालकवी संमेलन ,भाषिक काव्यकोडी ,विज्ञान काव्यकोडी, जो दिनांक तो पाढा ,मोबाईलला बाय पुस्तकाला हाय बालनाट्य लेखन ,प्रभावी संवादलेखन व दिग्दर्शन ,दिनविशेष काव्यलेखन ,समाज प्रबोधक काव्य निर्मिती व सादरीकरण आदि उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम , मातृभाषा संवर्धन, शैक्षणिक व काव्यलेखन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित विशेष समारंभात कवी डॉ गवाजी बळीद यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समता भवन जुईनगर सानपाडा नवी मुंबई येथे रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदान करून सन्मानीत करण्यात येणार असल्याचे दिशा महाराष्ट्राची या प्रसिद्ध वृत्तवाहीनीच्या वतीने संपादक तुषार नेवरेकर यांचेकडून निवड पत्राद्वारे कळविण्यात आले आहे . नुकताच कवी डॉ गवाजी बळीद यांचा “दिनविशेष काव्यधारा ” हा बहुचर्चित व विद्यार्थी उपयोगी काव्यग्रंथ प्रकाशित झाला असून या यशाबद्दल कवी शिक्षक डॉ गवाजी बळीद यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आनंद भंडारी साहेब , शिक्षणाधिकारी मा बाळासाहेब बुगे मा गटविकास अधिकारी महेश दहिफळे मॅडम, गट शिक्षणाधिकारी शैलजा राऊळ मॅडम ,शिक्षण विस्तार अधिकारी डॉ .शंकर गाडेकर साहेब ,अधिव्याख्याता डॉ मुकुंद दहिफळे साहेब, जालींदर बटुळे साहेब सुदामजी बटुळे साहेब ,प्रा डॉ बाबुराव उपाध्ये , डॉ प्रज्ञा पवार ,डॉ. शिवाजी काळे, डॉ संगीताताई फासाटे ,प्रा राधाकिसन देवरे ,प्रा प्रशांत वाघ ,प्रा विठ्ठलराव सोनवणे ,प्रा चंद्रकांत कर्डक , पत्रकार डॉ बाळासाहेब कोठुळे ,प्रेमानंद बच्छाव , सूरज क्षेत्रे ,सुरेश घोक्षे , शरद चाबुकस्वार ,प्रा किसन चव्हाण ,प्राचार्य संपतराव दसपुते ,प्राचार्य सुरेश शेरे , शिक्षक बँकेचे संचालक मा रमेशजी गोरे ,केंद्र प्रमुख बबनराव ढाकणे ,रघुनाथ लबडे ,श्रीकृष्ण शेळके ,नामदेवराव धायतडक ,सोपानराव डांगे , ज्ञानेश्वर तहकीक सर्जेराव निकाळजे संजय दुधाडे प्रा ज्योतीक सुनिल जायभाये सादिक शेख संजय मरकड प्रा आगवणे सुभाष बर्डे मुख्याध्यापक तुकाराम भगत ,सहकारी शिक्षक दादासाहेब चव्हाण, बाबासाहेब हरदास, रविंद्र घनवट ,मंजुश्री कारभारी नाचन – खंडागळे, पूनम राऊत – वाघमारे ,दत्ता सुरवसे सर्व शिक्षक विषयतज्ञ साधनव्यक्ती ,विषय शिक्षक यांचेसह चेअरमन कल्याणराव नेमाने ,सरपंच विठाताई नेमाने व सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभय गोरे, उपाध्यक्ष कोमल दारूणकर यांचे सह सर्व सदस्य भारतशेठ लोहकरे ,माजी सरपंच शहादेव पातकळ , दत्तात्रय झेंड, सुधाकर सांगळे ,प्रा सुभाष विखे ,संजय दारूणकर ,डॉ बी एम ठोंबरे, अशोक पातकळ, रविंद्र लहासे ,नवनाथ गायकवाड उमेद वाचनालय बोधेगाव व उमेद वाचनालय व अभ्यासिका वरखेड सर्व उमेदियन्स मित्र परिवार आप्तेष्टासंह पंचक्रोशीतील नागरिक व विद्यार्थ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे