ब्रेकिंग

सहा महिने उलटूनही अहवाल प्रलंबित; मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांचा १ डिसेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

सहा महिने उलटूनही अहवाल प्रलंबित; मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांचा १ डिसेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

कोपरगाव : श्री गुरुदेव दत्त मागासवर्गीय सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, कोपरगाव या संस्थेच्या भूखंड हस्तांतरण व्यवहारास व वारस सभासदत्वास मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्याकडे १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सादर करण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावासंदर्भात मागविण्यात आलेले अहवाल सहा महिने उलटूनही सादर न झाल्याने संस्थेच्या सभासदांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.माननीय जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कोपरगाव यांना १२ मे २०२६ आणि २४ जुलै २०२६ रोजी पत्र पाठवून मान्यता प्रस्तावामध्ये नमूद नसलेल्या उर्वरित सभासदांची सुनावणी घेऊन त्याबाबत लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच संस्थेचे भूखंड हस्तांतरित केलेल्या सर्व सभासदांना संस्थेचे सभासद करून घेण्यास पात्र आहेत किंवा कसे, याबाबत अभिप्राय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यास सांगितले होते.परंतु, माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या या दोन्ही पत्रांवर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कोपरगाव यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संस्थेच्या सभासदांना न्याय मिळण्यास विलंब होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर संस्थेचे सर्व सभासद एकत्रित येऊन आज, बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कोपरगाव यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन लेखी निवेदन दिले. सोमवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनी मागविलेले दोन्ही प्रलंबित अहवाल पूर्ण करून संस्थेच्या सभासदांच्या पात्रतेबाबत योग्य अभिप्राय सादर करावा, अशी मागणी करण्यात आली.तसेच, निर्धारित मुदतीत अहवाल सादर न झाल्यास मंगळवार, दिनांक १ डिसेंबर २०२६ रोजी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कोपरगाव यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा संस्थेच्या सभासदांनी दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन सहाय्यक निबंधक एस. पी. रुद्राक्ष यांना सर्व सभासदांच्या वतीने देण्यात आले.यावेळी संस्थेच्या व्हाईस चेअरमन अलका अशोक कनगरे, सचिव मनोरमा वसंत गाडे, संगीता सुदामराव अहिरे, साधना राजेंद्र शिवदे, मुक्ताबाई शहाजी आराख, शोभादेवी भीमराव मोकळ, वसंत पांडुरंग गाडे, सदाशिव भिकन भाऊ साठे, प्रशांत सुदामराव अहिरे, रोहित अशोक कनगरे, अरुणा विजय वर्हे, विशाल विजय वर्हे, कुणाल विजय वर्हे, भीमराव मोकळ, सुशीला वाल्मिक शिवदे, सुशीलाबाई कारभारी पठारे यांच्यासह संस्थेचे अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थेच्या सभासदांना त्यांच्या भूखंड हस्तांतरण व्यवहारास व वारस सभासदत्वास मान्यता मिळण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून प्रलंबित अहवाल सादर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे