आत्मा मालिक सत्संग मंडळ कोपरगाव तर्फे भव्य पायी दिंडी सोहळा संपन्न
आत्मा मालिक सत्संग मंडळ कोपरगाव तर्फे भव्य पायी दिंडी सोहळा संपन्न
संपादक:- रवींद्र जगताप
कोपरगाव :-आत्मा मालिक सत्संग मंडळ कोपरगाव यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते अनेक धार्मिक कार्यक्रमातून समाज प्रबोधन ते करत असतात राज्यभरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना आत्मा मालिक सत्संग मंडळ कोपरगाव तर्फे भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आषाढी एकादशी निमित्ताने आयोजन करण्यात आले होते.सदरची दिंडी सोहळा महादेवनगर खर्डे बिल्डिंग पासुन सुरु होवुन जंगली महाराज आश्रम येथे संपन्न झाला या दिंडीमध्ये मोठ्या उत्साहाने महिला व लहान मुलांचा समावेश होता.पायी दिंडीत सहभाग घेणाऱ्या खास महिलांसाठी बाबांच्या हस्ते गुरुप्रसाद म्हणून देण्यात आला प्रथम बक्षीस सौ रत्नमाला साटोटे सोन्याची नथ दृतीय बक्षीस सौ छाया मोरे पैठणी साडी तृतीय बक्षीस सुनंदा सोनवणे विठ्ठल रुक्मिणी मूर्ती यांना देण्यात आले कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी बी टी खर्डे काका देवा मोरे राहुल भागवत बाबू काटकर अतुल दोरकर संजू भाऊ भडकवाडे कुलकर्णी काका मालजी पाहुणे स्वप्निल मोरे यांनी परिश्रम घेतले





