संपादकीय

कोपरगावातुन अहमदनगरला जायचे, मग पुण्याहून पुणतांबा

संपादकीय

कोपरगावातुन अहमदनगरला जायचे, मग पुण्याहून पुणतांबा

पुण्याहून पुणतांबा हि म्हण कोपरगाव परिसरात प्रचलित आहे.कोपरगावकर हि म्हण नेहमी म्हणत असतात एखाद्या ठिकाणी जायचे असल्यास लोक शाँटकट पाहत असतात.हा शाँटकर्ट लांब पडल्यास पुण्याहून पुणतांबा अशी म्हण आहे.किंवा जवळपास जायचे असल्यास लांब अंतराहुन गेल्यास कोपरगावकर पुण्याहून पुणतांबा असे म्हणतात.कोपरगाव येथून पुणतांबा २० किलोमीटर आहे.कोपरगातुन पुणे अंदाजे २०० ते २५० किलोमीटर आहे.पुणतांब्याला जायचे असल्यास पुण्याहून जा अशी म्हण लोक म्हणतात.म्हणजे दुर अंतरावरून जाणे असा अर्थ ह्या म्हणीत होतो.आजच्या धकधकीच्या जीवनात वेळेला खुप महत्व आहे.कोपरगावकरांना सध्या हि म्हण तंतोतंत लागू पडत आहे.सध्या कोपरगावहुन अहमदनगर जाण्यासाठी जीव धोक्यात घालून जावे लागते.या रस्त्याला इतके खड्डे पडले आहे की,रस्तात खड्डा की, खड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे.बांधकाम खाते मात्र या गोष्टीकडे कानाडोळा    करतांना दिसत आहे.अनेकांचे प्राण या खराब रस्तामुळे गमवावे लागले आहे.खरतर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा.अनेक संघटना, पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यावर वेळोवेळी आंदोलन निवेदन देवुन आवाज उठवतात.परंतु परिस्थिती जैसे थे वैसी आहे

.या खराब रस्त्याची गुगल देखील दखल घेतली असून गुगल मँपवर कोपरगाव ते अहमदनगर रस्ता विचारल्यास वैजापुर मार्गे गंगापुर नेवासा नगर असा मार्ग दाखवत आहे.गुगल मँपही वैजापुर मार्गे जा हा पर्याय सुचवीत आहे.परंतु प्रशासनाला काही जाग येईना,काही दिवसापूर्वी हा गुगल मँप कोपरगाव वैजापुर गंगापुर मार्गे अहमदनगर असा हा मँप सोशल मिडियावरही फिरतांना दिसत होता.अनेकांनी शेअर करत आपल्या मनातील भावनाही सोशल मिडियावर व्यक्त केल्या होत्या.या गुगलवर दिसणार्या मँप नुसार अनेक नागरिक या पर्यायी रस्त्याचा वापर देखील करत आहे.कोपरगावातील अनेक नागरिक याच मार्गाने जातांना    सध्या दिसत आहे.यालाच म्हणतात पुण्याहून  पुणतांबा.कोपरगाव शिर्डी,राहता,राहुरी भागातील नागरिक या रस्त्याला वैतागून गेले आहेत.अहमदनगर कोपरगाव पासून १०० किलोमीटर अंतर आहे.या १०० किलोमीटर अंतरावर नगर मनमाड रोड वर इतके खड्डे आहे की,याचा विक्रम होईल,दररोज प्रवास करणार्या नागरिकांना मणके, पाठ दुःखी असे विविध आजार होत आहे.अनेक संघटना, सामाजिक, कार्यकर्ते या रस्त्यासाठी आंदोलन करत आहे.हा रस्ता  कधी होतो. याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

लेखन :-रविंद्र जगताप

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे