ब्रेकिंग
कै.सौ. गुफाबाई नामदेव पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षरोपण


कै.सौ. गुफाबाई नामदेव पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षरोपण
घारी ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर येथील कै.सौ.गुफाबाई पवार यांचा १९ आँगस्ट २०२५ रोजी दशक्रिया विधी संपन्न झाला.पवार कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपत या निमित्ताने वृक्षरोपण केले आहे.नामदेव हरि पवार कर्णासाहेब हरी पवार द्वारकानाथ नामदेव पवार तेजस द्वारकानाथ पवार सुजीत सुधाकर पवार नदाबाई गोरक्ष जगताप गं.भा. अलका लक्ष्मणराव रोठे आदि कुटुबातील नागरिकांनी वृक्षरोपन करुन एक नविन आदर्श निर्माण केला आहे.वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे या संत वचनाप्रमाणे वृक्षांचे महत्त्व आमच्या जीवनात अनन्यसाधारण आहे. निसर्ग आपले आरोग्य जपतो. मग साहजिकच निसर्गाची जपणूक ही आपली जबाबदारी आहे, असा संदेश वृक्षारोपणाच्या या सामाजिक कार्यक्रमातून पवार कुटुबांनी दिला आहे.


