कोपरगांव तालुकाच्या बॉडी बिल्डिंग असोसिएशन च्या तालुका अध्यक्ष पदी राहुल पहिलवान तर कोपरगाव शहर अध्यक्ष पदी विदीत जोशी
कोपरगांव तालुकाच्या बॉडी बिल्डिंग असोसिएशन च्या तालुका अध्यक्ष पदी राहुल पहिलवान तर कोपरगाव शहर अध्यक्ष पदी विदीत जोशी
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगांव तालुकाच्या बॉडी बिल्डिंग असोसिएशन च्या तालुका अध्यक्ष पदी राहुल पहिलवान तर कोपरगाव शहर अध्यक्ष पदी विदीत जोशी यांची निवड करण्यात आली.नुकत्याच राहुरी येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डिंग & फिजिक स्पोर्ट्स अहमदनगर च्या जिल्हा तसेच कोपरगाव तालुका कार्यकारिणी ची निवड करण्यात आली. त्यावेळी संघटनेच्या कोपरगाव तालुका अध्यक्ष पदी राहुल पहिलवान तर कोपरगाव शहर अध्यक्ष पदी विदीत जोशी यांची निवड करण्यात आली तसेच अहमदनगर जिल्ह्या संघटनेच्या खजिनदार पदी प्रतिक पाटील आणि सहखजिनदार पदी राहुल कुलकर्णी यांची निवड झाली.या वेळी संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते. सर्वानुमते निवड झालेल्या सभासदांना निवडीचे पत्र देण्यात आले. संघटना जिल्हाभर जास्तीत जास्त स्पर्धा घेण्यावर भर देईल व चांगले खेळाडू तयार करेल अशी सर्वांनी ग्वाही दिली. संघटनेच्या सर्व सभासदांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.



