धार्मिक

ना. आशुतोष काळेंनी सपत्नीक घेतले अमृतेश्वराचे दर्शन

माहेगाव देशमुख येथील अमृतेश्वराचे सपत्नीक दर्शन घेतांना ना. आशुतोष काळे, सौ. चैतालीताई काळे, आयांश काळे.

संपादक :- रवींद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी :- महाशिवरात्री निमित्त श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी पत्नी सौ. चैतालीताई काळे यांच्या समवेत आपल्या गावी माहेगाव देशमुख येथील अमृतेश्वराची मनोभावे विधिवत पूजा व दुग्धाभिषेक करून दर्शन घेतले.   कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे श्री संत सदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या प्रेरणेतून माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या पुढाकारातून कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे भव्यदिव्य अमृतेश्वराचे मंदिर बांधण्यात आलेले आहेत. अलाहाबाद येथील स्वामी शंकराचार्य व श्री संत सदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी) आश्रमाचे प.पु.रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते या मंदिरात २००५ साली शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला ना. आशुतोष काळे आपल्या व्यस्त कार्यक्रमातून सर्वप्रथम अमृतेश्वराचे दर्शन घेवून कोपरगाव तालुक्यातील विविध महादेव मंदिरांत जावून देखील दर्शन घेत असतात.त्याप्रमाणे मंगळवारी देखील महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांनी सपत्नीक अमृतेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर दक्षिण वाहिनी गोदावरी नदीवर असलेल्या कुंभारी येथील राघवेश्वराचे व पौराणिक वारसा असलेल्या कोपरगाव बेट येथील दैत्यगुरू शुक्राचार्याचे दर्शन घेतले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे