संवत्सर येथे श्रामणेर संघाचे जोरदार स्वागत

संवत्सर येथे श्रामणेर संघाचे जोरदार स्वागत
कालकथित छगनराव संपतराव गवळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भोजनदान कार्यक्रम संपन्न
श्रामणेर संघाचे उत्स्फूर्त स्वागत; १५ नोव्हेंबर रोजी भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत धम्म परिषद
कोपरगाव : संवत्सर येथील.कालकथित छगनराव संपतराव गवळी यांचा १२ नोव्हेबर २०२६ स्मृतिदिन प्रसंगी श्रामणेर संघाचे स्वागत करण्यात आले. गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी भोजनदान. व श्रामणेर संघाचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. .या कार्यक्रमाला थायलंड येथील महाथेरो ओबास, मुंबई येथील भन्ते संघपाल, भन्ते सुमन श्री, भन्ते कश्यपजी, भन्ते धम्मश्री यांच्यासह श्रामणेर संघ उपस्थित होता. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कोपरगाव तालुका व शहर पदाधिकारी, अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.छगनराव संपतराव गवळी हे विलास गवळी यांचे वडील होत. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित भोजनदान कार्यक्रमातून बुद्धांच्या विचारांचा, दानपारमितेचा आणि धम्मसेवेचा संदेश देण्यात आला.दरम्यान, कोपरगाव शहरात सुरू असलेल्या दहा दिवसीय श्रामणेर शिबिराचा सांगता समारंभ रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे. या सोहळ्यानिमित्त आयोजित धम्म परिषदेला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर साहेब उपस्थित राहणार आहेत.या धम्म परिषदेला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



