सामाजिक

इतर खर्चाला फाटा देत अनाथ आश्रमातील मुलांबरोबर केला वाढदिवस साजरा

इतर खर्चाला फाटा देत अनाथ आश्रमातील मुलांबरोबर केला वाढदिवस साजरा

कोपरगाव : राहता तालुक्यातील सागर कोलते या युवकाने वाढदिवसानिमित्त इतर वायफट खर्चाला फाटा देत शिर्डी येथील साई सावली अनाथ आश्रमातील लहान मुलांबरोबर केक कापून वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तेथील लहान मुलांना पावभाजीची पंगत देऊन त्यांचा दिवस गोड केला.याबद्दल तेथील सर्व शिक्षकांनी व मुलांनी त्याचे आभार मानले.यावेळी राहुल बोटे,अनिल गाढवे, बंटी गायकवाड, विशाल कापसे, देवेंद्र सातूरे, योगेश कांबळे, पत्रकार अमोल गायकवाड इत्यादी युवक उपस्थित होते.अशाच प्रकारे इतर तरुणांनी पण आपला वाढदिवस इतर खर्च न करता अनाथ आश्रमातील मुलांना अन्नदान देऊन वाढदिवस साजरा करावा असे आवाहन वाढदिवस असणाऱ्या सागर कोलते या युवकाने केले आहे.

 

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे