सामाजिक

साई संजीवनी बँक रिझर्व बँकेच्या निर्बंधातून मुक्त नारायण अग्रवाल, संचालक साई संजीवनी बॅक कोपरगाव.

 
साई संजीवनी बँक रिझर्व बँकेच्या निर्बंधातून मुक्त
नारायण अग्रवाल, संचालक साई संजीवनी बॅक
कोपरगाव.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे आणि कोपरगांवच्या व्यापा-याचं अतुट नातं होतं. साहेबांना काही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले तर कधीच टाळत नसे. त्यानिमीत्ताने इकडच्या तिकडच्या आठवणींना नेहमी उजाळा मिळत असे. ते काम करत असलेल्या साईसंजीवनी (पुर्वीची देवयानी) बँकेवर रिझर्व्ह बँकेचे आर्थीक निर्बंध बसले होते त्याही परिस्थितीत शंकरराव कोल्हे व मुख्य कार्यकारी अधिकारी पदमाकर सभारंजक यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेला अनियमीततेची कारणं आणि कर्जदार शेतक-यांकडे थकीत असलेले कर्ज वसुल याबाबतची माहिती देत वस्तुस्थितीनुरूप कागदपत्रांची सत्यता पडताळून दिली. दैनंदिन आर्थीक व्यवहारात नियमीतता आणली आणि देशांत सर्वप्रथम देवयानी बँकेला आरबीआयने लावलेली ३५ ए ची नोटीस उठली गेली यावरून माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेल्या संस्थांना कसे जीव लावत व त्यात गतीमानता आणुन सभासद शेतक-यांचा विश्वास तसूभरही ढळू देत नव्हते.परिस्थितीने सर्वसामान्य असलेल्या व्यक्तींची ठेव सुरक्षीत राहिली पाहिजे हाच त्याचा कटाक्ष होता व त्यांची पुढची पिढी देखील तोच वसा घेवुन बँकींग क्षेत्रात कार्यरत आहे म्हणूनच साई संजीवनी बँकेला महाराष्ट्र राज्यस्तरावर आजवर गेल्या ८-९ वर्षापासुन आर्थीक क्षेत्रात उन्नत असलेल्या विभागात पुरस्कार मिळत आहे संचालक मंडळ आणि सर्व व्यवस्थापन शिस्तीने काम करतात हेच यशाचे गमक आहे.
 नारायण अग्रवाल, संचालक साई संजीवनी बॅक
कोपरगाव.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे