कृषीवार्ता

निळवंडेच्या पाण्याने पाझर तलाव भरल्याबद्दल आमदार विवेक कोल्हे यांचे ग्रामस्थांकडून आभार

निळवंडेच्या पाण्याने पाझर तलाव भरल्याबद्दल आमदार विवेक कोल्हे यांचे ग्रामस्थांकडून आभार
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव,वेस सोयगाव, अंजनापूर, बहदराबाद, बहादरपूर, मनेगाव, डांगेवाडी तसेच पंचक्रोशीतील विविध गावांमधील पाझर तलाव निळवंडे धरणाच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरून देण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार विवेक कोल्हे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामस्थांनी आमदार विवेक कोल्हे यांच्याकडे पाझर तलाव भरून देण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार कोल्हे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाठपुरावा केला. त्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत परिसरातील साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून दिले.
या निर्णयामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार असून विहिरींना पाणी उपलब्ध राहणार आहे. तसेच शेतकरी व नागरिकांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.ग्रामस्थांनी सांगितले की, आमदार विवेक कोल्हे यांनी नेहमीप्रमाणे जनतेच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने लक्ष देत तातडीने सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई टळण्यास मोठी मदत झाली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे