ब्रेकिंग

संजीवनीच्या चार प्राध्यापकांची इंटरनॅशनल पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिपमध्ये यशस्वी झेप!

संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे यांनी संजीवनीच्या चार प्राद्यापकांनी आंतरराष्ट्रीय पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप मिळाविल्याबध्दल सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र.
संजीवनीच्या चार प्राध्यापकांची इंटरनॅशनल पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिपमध्ये यशस्वी झेप!
संजीवनीच्या संशोधन व शैक्षणिक गुणवत्तेला नवी ओळख
कोपरगांव:- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज आणि संजीवनी विद्यापिठाच्या चार  प्राध्यापकांनी इंटरनॅशनल पोस्ट डाॅक्टरेट रिसर्च फेलोशीप पूर्ण केली. त्यामुळे संजीवनीने शैक्षणीक आणि संशोधन क्षेत्रात आपणी नवी ओळख निर्माण केली. संजीवनी विद्यापिठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी या प्राध्यापकांचा सत्कार केला आणि त्यांच्या यापुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संजीवनीचे प्राध्यापक डॉ. एस. आर. देशमुख, डॉ. ए. व्ही. ब्राह्मणे आणि डॉ. एम. व्ही. कुलकर्णी यांनी सिंगापूरचे प्रसिध्द  सरकारी विद्यापीठ ‘सिंगापुर इन्स्टिट्युट  ऑफ  टेक्नाॅलाॅजी’ येथून पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप पूर्ण केली. तर डॉ. एम. बी. गवळी यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘युनिव्हर्सिटी ऑफ  डेलावेअर’ येथून ही फेलोशिप पूर्ण केली.
याबाबत माहिती देताना संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे म्हणाले, पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप ही पीएच.डी. पदवीनंतर संशोधन क्षेत्रात अधिक उच्चस्तरीय प्रावीण्य मिळविण्याची महत्त्वपूर्ण संधी असते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन पद्धती, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव त्यातून मिळतो. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत संशोधन विषयक सहकार्य, संयुक्त संशोधन प्रकल्प, आंतरराष्ट्रीय दर्जाची संशोधनपत्रे आणि पेटंट निर्मितीला त्यातून चालना मिळते. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  श्री नितीनदादा कोल्हे यांनी या प्राध्यापकांचे अभिनंदन केले. यावेळी संजीवनी विद्यापीठाचे व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकूर, रजिस्ट्रार डॉ. अमोल ढाकणे, संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. ए. बी. पवार आणि स्थापत्य व संरचनात्मक अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. ए. एस. सय्यद आदि उपस्थित होते.


संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज आणि संजीवनी विद्यापिठाच्या चार  प्राध्यापकांनी इंटरनॅशनल पोस्ट डाॅक्टरेट रिसर्च फेलोशीप पूर्ण केली. त्यामुळे संजीवनीच्या ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना   जागतिक स्तरावरील संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या  ध्येयाला अधिक बळ मिळेल. या चारही प्राध्यापकांचे यश म्हणजे संजीवनीची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन संस्कृती आणि जागतिक स्तरावर वाटचाल करण्याच्या क्षमतेचे द्योतक आहे.-श्री अमित कोल्हे (प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी)

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे