शिर्डी येथे शिवसेनेचा पदाधिकारी-कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

शिर्डी येथे शिवसेनेचा पदाधिकारी-कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न
शिर्डी, :* अहिल्यानगर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सुनीलभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांसाठी भव्य मार्गदर्शन मेळावा शिर्डी येथे संपन्न झाला. या मेळाव्याला जिल्हाभरातून शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.

मेळाव्यानंतर शिर्डीतील सन अॅड सन हॉटेल येथे झालेल्या विशेष बैठकीत शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांतजी खैरे आणि संपर्कप्रमुख आ. सुनीलभाई शिंदे यांची पुणतांबा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.

यावेळी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी व जिल्हा शिवसेना नेते सुहास वहाडणे पाटील यांनी पुणतांबा शहर शिवसेना व शिव आरोग्य सेनेच्या कार्याचा सविस्तर आढावा मान्यवरांसमोर सादर केला. पुणतांबा येथे राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची व पक्षबांधणीच्या कामाची माहिती ऐकून सर्व वरिष्ठ नेत्यांनी समाधान व्यक्त केले. मान्यवरांनी पुणतांबा शिवसेनेचे विशेष कौतुक करून शहरप्रमुख महेश कुलकर्णी व सुहास वहाडणे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.या भेटीदरम्यान सुहास वहाडणे व महेश कुलकर्णी यांनी सर्व मान्यवरांना भगवी शाल अर्पण करून पक्षवाढीसाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी अहिल्यानगर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी, अहिल्यानगर महानगर प्रमुख किरण काळे, उपजिल्हा प्रमुख रावजी नागरे, भंडारा जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, माजी राहाता तालुकाप्रमुख तथा विद्यमान उपजिल्हा प्रमुख नाना बावके, घाटकोपर पंतनगर शाखाप्रमुख विशाल चावक, अमोल वंडेकर, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख पप्पूभाई भाले, उपजिल्हा प्रमुख दीपक भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



