एस.एस.जी.एम महाविद्यालयात कै. सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या ९५ व्या पुण्यतिथीचे आयोजन

एस.एस.जी.एम महाविद्यालयात कै. सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या ९५ व्या पुण्यतिथीचे आयोजन
कोपरगाव दि.२६. रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे पद्मभूषण, शिक्षणमहर्षी, ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविणारे आधुनिक भगीरथ कर्मवीर भाऊराव पाटील यांना समाज आणि शैक्षणिक कार्यात अखेरपर्यंत सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या रयत माऊली कै. सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा ९५ वा पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. २९ मार्च २०२५ रोजी केलेले आहे.


सदर पुण्यस्मरण सोहळा मा. श्री. महेंद्रकुमार काले (सदस्य,महाविद्यालय विकास समिती )यांच्या उपस्थितीत होणार असून या सोहळ्यासाठी मा. सौ. चैतालीताई काळे (सदस्या,महाविद्यालय विकास समिती) या अध्यक्ष म्हणून उपस्थित असणार आहे.
तरी जास्तीत जास्त रयत सेवक, विद्यार्थी-विद्यार्थींनी, प्राध्यापक,शिक्षकेतर सेवक व नागरिकांनी या सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे यांनी केले आहे



